Benefits of Moisturizer on Skin: मॉइश्चरायझर लावताना तुम्हीही 'या' चुका करताय? मग ही बातमी वाचाच

अनेक लोक त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझर वापरतात. परंतु मॉइश्चरायझर लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेऊया.
Benefits Of moisturizer
Benefits Of moisturizerDainik Gomantak
Published on
Updated on

Benefits of Moisturizer on Skin: मॉइश्चरायझर कोणत्याही ऋतुमध्ये लावणे त्वचेसाठी फायदेशीर असते. त्वचेचा ड्रायपणा टाळण्यासाठी अनेक लोक त्वचेवर मॉइश्चरायझर लावतात.पण तुम्हाला माहिती आहे का आपले वय जसजसे वाढते तसतसे चेहऱ्याचे हायड्रेशन कमी होऊ लागते. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे.

परंतु केवळ चेहऱ्यावर (Face) मॉइश्चरायझर लावणे आवश्यक नाही तर उत्तम परिणाम मिळविण्यासाठी मॉइश्चरायझ लावण्याची योग्य पद्धत जाणून घेणे देखील आवश्यक आहे. बरेच लोक त्यांच्या त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझर वापरतात.  मॉइश्चरायझर लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

  • मॉइश्चरायझर लावण्याचे फायदे

मॉइश्चरायझर्स त्वचेला हायड्रेट आणि पोषण देण्यास मदत करतात. हे कोरडेपणा टाळण्यासाठी, त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्वचेला मऊ आणि चमकदार बनवण्याचे काम करते. मॉइश्चरायझर क्रीम, लोशन, जेल आणि तेल म्हणून देखील वापरले जाऊ शकते. 

  • कमी लावणे

त्वचेवर योग्य प्रमाणात मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे. त्वचेचा प्रकार पाहून मॉइश्चरायझरचे प्रमाण बदलू शकते. जर तुमची त्वचा ओलसर वाटत असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने मॉइश्चरायझरचा वापर केला आहे.

Benefits Of moisturizer
Benefits of Steaming on Face: चेहऱ्यावर वाफ घेणे किती फायदेशीर ? जाणून घ्या वैज्ञानिक कारण
  • ड्राय स्किन

त्वचा तज्ज्ञांच्या मते, ड्राय स्किनवर मॉइश्चरायझर लावू नये. मॉइश्चरायझर लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जेव्हा त्वचा ओलसर असते. आंघोळीनंतर 5 ते 10 मिनिटांच्या आत मॉइश्चरायझर लावावे.  यामुळे त्वचेतील ओलावा कोरडा होत नाही, या काळात मॉइश्चरायझर लावल्याने सेन्मी सील होण्यास मदत होते.

  • फक्त सकाळी वापरणे

काही लोक सकाळच्या वेळीच मॉइश्चरायझर लावतात. पण तुम्ही ते सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस लागू करू शकता. पण, संध्याकाळी मॉइश्चरायझर लावणे चांगले असते. अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सकाळी सनस्क्रीनसह मॉइश्चरायझर वापरावे. रात्री तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये मॉइश्चरायझिंग मॉइश्चरायझर वापरावे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com