Benefits of Steaming on Face: चेहऱ्यावर वाफ घेणे किती फायदेशीर ? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत लोक चेहऱ्यावर वाफ घेतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का केले जाते?
Benefits of Steaming on Face
Benefits of Steaming on FaceDainik Gomantak
Published on
Updated on

Benefits of Steaming on Face: तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही लोक पार्लरमध्ये किंवा घरात डोक्यावर टॉवेल ठेवून गरम पाण्याची वाफ घेतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का केले जाते? तर चला तर मग जाणून घेऊया तुमच्या प्रश्नाचे उत्तर काय आहे. 

वाफ घेतांना काही लोक गरम पाण्यात कडुलिंब, मीठ आणि लिंबू यांसारख्या गोष्टी टाकतात. यामागे त्वचेशी संबंधित काही रहस्ये असतील जी आजपर्यंत तुमच्या समोर आलेली नाहीत. चला, आज आपण हे रहस्य जाणून घेणार आहोत.

चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे

  • हायड्रेशन

    कधीकधी पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा डिहाइड्रेट होऊ लागते. त्वचेची क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर वाफ घेउ शकतात. यामुळे चेहऱ्याचे हायड्रेशन कायम राहते, असे केल्याने तुमचा चेहरा चमकदार होईल.

  • चमकदार त्वचा

    वाफ घेतल्याने चेहऱ्यावर कोलेजन आणि इलास्टिनचे उत्पादन वाढते. यामुळे आपला चेहरा चमकदार दिसतो. सामान्यत: त्वचेची (Skin) काळजी घेणारे तज्ञ आठवड्यातून 3 वेळा स्टीम घेण्याचा सल्ला देतात.

  • सुरकुत्या कमी होतात

    वाफ घेतल्याने चेहऱ्यांवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. म्हणूनच आठवड्यातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर वाफ घ्यावी.

Benefits of Steaming on Face
Milk Ice Cube For Glowing Skin: त्वचेला चमकदार बनवण्यासाठी वापरा 'मिल्क आइस क्यूब', जाणून घ्या कसे बनवाल
benefits to using a face steam
benefits to using a face steam Dainik Gomantak
  • क्लीनिंग

    जे लोक नियमित चेहऱ्यावर वाफ घेतात, त्यांच्या त्वचेची छिद्रे उघडतात, ज्यामुळे घाण आणि मृत त्वचा बाहेर निघते. विशेषत: ज्यांना ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सचा त्रास आहे. त्यांच्यासाठी स्टीम घेणे हा रामबाण उपाय आहे. यामुळे चेहरा (Face) स्वच्छ होउन चमकदार दिसतो. 

  • रक्ताभिसरण

    तुम्ही तुमच्या त्वचेची कितीही काळजी घेत असाल तरी सुद्धा कधी कधी असं होतं की ती निस्तेज आणि डिहायड्रेटेड दिसू लागते. अशावेळी चेहऱ्यावर वाफ घेणे फायदेशीर असते. हे त्वचेचे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी खूप प्रभावी आहे.

  •  पिंपल्स कमी होतात

    चेहऱ्यावर वाफ घेतल्याने पीपल्स कमी होतात. कारण वाफ घेतल्याने पीपल्स पसरविणारे बॅक्टेरिया नष्ट होऊन चेहरा स्वच्छ होतो. तसेच नियमित स्क्रब करणे गरजचे राहणार नाही.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com