लठ्ठपणा कोणालाच आवडत नाही. लठ्ठपणामुळे (Fat) अनेक आजार निर्माण होऊ शकतात. लठ्ठपणापासून (Fat) मुक्त व्हायचे असेल तर अनेकजणांनी जीममध्ये (Jim) जाऊन डाएटिंग (Dieting) करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु अजून देखील सकारात्मक परिणाम दिसून आला नसेल. लठ्ठपणा कमी करणे म्हणजे एक आव्हानच होय. केवळ डाएटिंग आणि व्यायाम केल्याने पोटावरची चरबी कमी होत नाही. तर साध्या साध्या चुका देखील लक्षात घेतल्या पाहिजे. आपण लठ्ठपणा कमी करतांना बरेच वेळा अशा चुका करतो. यामुळे वेळेची चुका शोधा आणि योग्य पद्धतीने वेट लॉस करा.
- बरेचजन असा विचार करतात की फक्त खूप व्यायाम केल्यानेच आपले वजन कमी होते. परंतु हे चुकीचे आहे. व्ययामाबरोबरच आपण आपला आहारही नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे . संपूर्ण दिवसात आपण किती कॅलरीज घेतो हे मोजायचे आहे. तसेच व्यायामाद्वारे किती बर्न करत आहोत यचही देखील नोंद ठेवावी लागणार आहे. एक गोष्ट लक्षात असून द्या कॅलरी घेण्याचे प्रमाण बर्न केलेल्या कॅलरीपेक्षा नेहमीच कमी असावी.
- दारू पिणे हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अनेक पेयांमद्धे साखरेचे प्रमाण अधिक असते. ती आपल्या शरीरसाठी हानिकारक ठरू शकते. तसेच अल्कोहोल हळूहळू तुमच्या शरीराला कमकुवत आणि आळशी बनवते. हे कॅलरीजनी भरलेले आल्याने लठ्ठपणा वाढू शकते.
- आपण आळशी असू तर वजन कमी करू शकत नाही. व्यायामाने खूप वेगाने कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते. तसेच व्यायाम असो, योगा असो किंवा वर्कआउट हे नियमित करण्याचा प्रयत्न करा. नाही तर चार दिवसातून केवळ एकदा तरी करावे. असे केल्यास वजन कमी होऊ शकते.
- लठ्ठपणा कमी करण्यासाठी कॅलरी कमी करणे गरजेचे असते. परंतु असे करतांना आपण आहारातून आवश्यक असणारे पोषक घटकच काढून टाकतो. असे केल्याने स्नायूंचे नुकसान होते तसेच शरीरातील पानी निघून जाते. यामुळे वजन वेगाने कमी होऊन लगेच वेगाने वाढते.
- माहमारीचा परिणाम तरूण वर्गावर मोठया प्रमाणात झालेला दिसून आला आहे. रात्री बऱ्याच वेळ जागने आणि सकाळी उशिरा उठणे. कमी झोपेमुळे फक्त शरीरात कोर्टिसोल हार्मोन वेगाने वाढून जंक फूड खाण्याची खूप इच्छा होते. या दोन्ही गोष्टी शरीरसाठी हानिकारक आहेत. म्हणून 6 टे 8 तास झोप घेणे महत्वाचे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.