Cooking Tips: लोखंडाच्या कढईत 'हे' पदार्थ कधीच बनवू नका, नाहीतर ठरतील जीवघेणे

लोखंडाच्या कोणत्याही भांड्यात कोणतेही पदार्थ बनवणे जावघेणे ठरु शकते.
Cooking Tips
Cooking TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Cooking Tips: आजकाल बाजारात अनेक प्रकारचे धातूची भांडी मिळतात. नॉनस्टिकपासून स्टेनलेस स्टीलपर्यंतची भांडी स्वयंपाकासाठी वापरली जातात. याशिवाय स्टील कोटिंगची नवीन भांडीही बाजारात उपलब्ध आहेत.

पण आजही असे काही पदार्थ आहेत जे नेहमी लोखंडाच्या भांड्यात बनवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अन्नातील लोहाचे प्रमाण अधिक वाढते आणि अन्न निरोगी बनते. विशेषत: हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवलेल्या चांगल्या मानल्या जातात.

त्यामुळे भाजीतील पौष्टिक घटक वाढतात. दुसरीकडे, जेव्हा आपण स्ट्रीट फूडमध्ये चाउमीन खातो तेव्हा ते स्वादिष्ट चाउमीन नेहमी लोखंडी भांड्यात बनवले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की असे काही पदार्थ आहेत जे लोखंडाच्या भांड्यात बनवल्याने आरोग्यासाठी जीवघेणे ठरु शकते.

  • मासे
    लोखंडाच्या भांड्यात मासे कधीही शिजवू नका. मासे स्वयंपाक करताना लोखंडी भांड्याला चिकटून राहतात, त्यामुळे ते शिजवणे कठीण होते आणि त्याचे बहुतेक भाग जळतात. लोखंडी भांड्यात मासे शिजवल्याने त्याची चव खराब होते. 

fish
fishDainik Gomantak
Cooking Tips
Chaitra Navratri 2023: नवरात्रीचे उपवास का असतात फायदेशीर? वाचा सविस्तर
  • अंडी
    चव वाढवण्यासाठी बरेच लोक अंडी लोखंडी पॅनमध्ये शिजवतात. पण असे केल्याने आरोग्याला (Health) हानी पोहोचते. कारण अंडी तव्याला चिकटून राहते त्यामुळे ऑम्लेटमध्ये लोहाची चव येऊ लागते आणि तवाही खराब होतो. 

egg
eggDainik Gomantak
  • पास्ता
    पास्ता ही एक अतिशय नाजूक डिश आहे. जी अत्यंत काळजीपूर्वक तयार करावी लागते. जास्त शिजवलेला पास्ता खूप चिकट होतो आणि पॅनला चिकटतो. जर तुमचा पास्ता जास्त शिजला असेल तर तो लोखंडी कढई बनवण्याची चूक करू नका. यामुळे लोखंडी भांडे खराब होतो आणि पास्त्याची चवही खराब होते.

One Pot Pasta Recipe
One Pot Pasta RecipeDainik Gomantak
  • हलवा किंवा गोड पदार्थ
    तुम्ही चुकून कधी लोखंडी कढईत किंवा पातेल्यात हलवा बनवला तर हलव्याला त्याचा वास आणि चव यायला लागते. म्हणूनच हलवा किंवा गोड पदार्थ लोखंडाच्या भांड्यात न बनवणे चांगले.

Halva
Halva
  • आंबट पदार्थ
    जर तुम्ही टोमॅटो, आमचूर, व्हिनेगर, लिंबू यांसारख्या आंबट गोष्टी कोणत्याही अन्नात वापरणार असाल तर लोखंडी भांडे वापरणे टाळा. कारण यामध्ये विष तयार होउन जीवघेणे ठरु शकते.

Tomato
TomatoDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com