Astrology Tips For Temple: घरातल्या देव्हाऱ्यात कोणत्या मूर्ती नसाव्यात

कोणत्या मूर्ती घरात नसाव्यात हे माहिती असायला हवे.
Astrology Tips For Idol
Astrology Tips For IdolDainik Gomantak

Astrology Tips For Temple: घरातील मंदिरात अनेक देवतांच्या मुर्ती आपण ठेवतो. त्यांची पूजा करतो, त्यांच्यासाठी नैवेद्य करतो. देवांचा आशिर्वाद आपल्यावर राहावा म्हणून धूपदीपही नित्यनेमाने लावत असतो.

पण कोणत्या मूर्ती घरात नसाव्यात. वाचून थोडंसं आश्चर्य वाटलं असेल मात्र हे खरं आहे. ज्योतिषशास्त्राच्या मते अशा काही मूर्ती आहेत, ज्या घरात ठेवू नये.

  • ज्योतिषशास्त्राच्या मते कोणत्या गोष्टी घरात ठेउ नये

घरामध्ये कोणत्या प्रकारच्या मूर्ती आणि कोणत्या देवतांची ठेवू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. अनेक लोक आपल्या घरात गणपतीच्या विविध प्रकारच्या आकर्षक मोठ्या मूर्ती ठेवतात, ज्यामध्ये गणपती बाप्पा खाटेवर पडून वाद्य वाजवत आहेत किंवा वाचत असतात.

पण तुम्ही चुकूनही अशा मूर्ती घरात आणू नयेत. देवाची प्रतिमा शो-पीस म्हणून वापरणे अशुभ मानले जाते.

Astrology Tips For Idol
Homemade Face Pack: ‘हे’ घरगुती फेस पॅक उन्हाळ्यात त्वचेला ठेवणार ग्लोइंग
  • लक्ष्मीची कोणती मूर्ती घरात नसावी

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीची मूर्ती कधीही उभ्या स्थितीत आणू नये. यामागील कारण असे की लक्ष्मी चंचल आहे आणि ती बसलेल्या स्थितीत असेल तरच तिचे पाय तुमच्या घरात टिकतील. 

  • देवांच्या किती मूर्ती घरात ठेवाव्या

देवाची कोणती मूर्ती ठेवावी आणि किती असाव्या याबाबत काही नियम सांगितले आहेत. जे तुम्ही समजून घेतले पाहिजेत आणि लक्षात ठेवले पाहिजेत. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नका आणि भगवान विष्णूच्या रूपातील शालिग्रामचा फक्त छोटा तुकडा घरात ठेवा.

इतर काही देवी-देवतांच्या मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते. यातील प्रामुख्याने शनिदेव, भैरवबाबा आणि नटराज यांच्या मूर्ती अशा आहेत की त्या घरात ठेवू नयेत.

याशिवाय काही छोट्या छोट्या गोष्टींचीही काळजी घ्या जसे की देवतांच्या मूर्ती खूप मोठ्या नसाव्यात. मूर्ती 6 इंचांपेक्षा मोठी ठेवू नका. यामागील शास्त्र असे आहे की मोठ्या मूर्तीला पाणी अर्पण करणे किंवा आंघोळ करणे, स्वच्छता करणे खूप कठीण आहे आणि त्यामुळे अनेकदा मोठ्या मूर्ती देखील अस्वच्छ राहतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com