Astro Tips of Gold : पायात सोनं घालण्याची सवय पडू शकते महागात; पाहा काय सांगतं ज्योतिषशास्त्र

हिंदू धर्म, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात सोन्याला खूप महत्त्व आहे.
Astro Tips of Gold
Astro Tips of Gold Dainik Gomantak
Published on
Updated on

हिंदू धर्म, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात सोन्याला खूप महत्त्व आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांशिवाय भारतीय महिलांचा शृंगार अपूर्ण आहे. स्त्री-पुरुषांसोबत लहान मुलेही सोन्याचे दागिने घालतात.

डोक्यापासून पायापर्यंत सोन्याचे दागिने बाजारात उपलब्ध असले तरी पायात सोन्याचे दागिने घालण्यास मनाई आहे. यामागे धार्मिक, ज्योतिषशास्त्रीय, वैज्ञानिक कारणेही आहेत. हेच कारण आहे की सर्वात श्रीमंत लोकही पायात सोन्याचे दागिने घालत नाहीत. पायात चांदीचे दागिने घालणे योग्य मानले जाते.

Astro Tips of Gold
Thyroid Remedies : थायरॉईडमध्ये आहे सूज? वापरा हे सोपे आणि घरगुती उपाय

1. पायात सोने धारण केल्याने लक्ष्मी देवी का नाराज होते?

सोन्याला खूप शुभ मानले जाते कारण भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला सोने आवडते. त्यामुळे नाभी किंवा कमरेच्या खाली सोने धारण केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. श्रीहरी आणि देवी लक्ष्मीची नाराजी जीवनात अनेक प्रकारचे संकट आणू शकते आणि व्यक्तीला कंगाल बनवू शकते. त्यामुळे पायात सोने कधीही घालू नये. म्हणूनच शरीराच्या वरच्या भागात भरपूर सोन्याचे दागिने असूनही स्त्रिया फक्त चांदीचे पायघोळ घालतात.

2 .पायात सोने घालण्याचे तोटे

अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पायात सोने धारण केल्याने आरोग्याला हानी पोहोचते. वास्तविक, मानवी शरीराच्या वरच्या भागाला उबदारपणा आणि खालच्या भागाला थंडपणाची आवश्यकता असते. सोने शरीरात उष्णता वाढवते, तर चांदी थंडपणा आणते, त्यामुळे पायात सोन्याऐवजी चांदी घातली पाहिजे जेणेकरून शरीरात तापमानाचे योग्य संतुलन राखले जाईल. अन्यथा, शरीराच्या तापमानातील असंतुलन अनेक प्रकारे नुकसान करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com