Astro Tips For Money: पैसा हा कष्टाने कमावला जातो. काही लोक भरपूर पैसेही कमावतात. पण तरीसुद्धा त्यांचा खिशा रिकामाच असतो. त्या लोकांना सारखी आर्थिक चिंता असते.
त्यांना आर्थिक परिस्थितीशी सतत झगडावे लागते. स्वयंपाकघरात उपस्थित असलेल्या या पांढऱ्या वस्तूचा वापर करून तुम्ही पैशाशी संबंधित तुमच्या मोठ्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. ज्योतिष शास्त्रात सांगितलेला हा उपाय केल्याने तुमचे उत्पन्न वाढण्यासोबतच घरात येणारा पैसाही टिकुन राहिल.
ज्योतिषशास्त्रात गव्हाच्या पिठाचा एक उपाय सांगितला आहे. गव्हाच्या पिठाने फक्त चार उपाय केल्याने घरात माता लक्ष्मीची कृपा राहील. उत्पन्न वाढीबरोबरच बचतीमुळे आर्थिक स्थिती सुधारेल.
आर्थिक संकटातून मुक्त होण्याचा हा एक सोपा मार्ग
ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही भरपूर कमाई करत असाल पण यानंतरही पैसे टिकून राहत नसेल तर हा उपाय नक्की करुन पाहा. यासाठी गव्हाचे पीठ दळण्यापूर्वी त्यात 100 ग्रॅम हरभरा, 100 ग्रॅम तुळस आणि केशर टाकावे.
या सर्व गोष्टी एकत्र करून शनिवारी पीठ दळून घ्यावे. आता घरातील (Home) सर्व सदस्यांनी या पिठापासून बनवलेल्या रोट्या खाव्यात. असे केल्याने घरातील पैशाची चणचण जाणवनार नाही. आर्थिक संकट दूर होईल. यासोबतच उत्पन्नातही वाढ होईल.
कर्जमुक्ती मिळेल
जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल ,पैसा मिळवण्याचे मार्ग बंद होत असतील तर ज्योतिष शास्त्राचा हा उपाय करू शकता. त्यात पिठाची भाकरी करून त्यावर मोहरीचे तेल लावावे. यानंतर शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालावी. यामुळे तुमची मोठ्या कर्जातूनही सुटका मिळेल.
हा उपाय केल्याने पैसा टिकेल
पैसे येऊनही थांबत नसेल तर गव्हाच्या पिठात थोडी हळद मिक्स करावी. आता हे पीठ गुरुवारी गायीला खाऊ घालावे. हा उपाय केल्याने घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती दूर होते. पैसे घरात राहू लागतील. यासोबतच मुंग्यांनाही पीठ खाऊ घालावे. त्याचा फायदा अधिक होतो.
सर्व समस्या दूर होतील
जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर दर शनिवारी सकाळी पीपळाच्या झाडाखाली पीठ किंवा मातीचा तुप घालून दिवा लावावा. त्याचबरोबर शनिदेवाचे नाव आणि तुमची इच्छा मनात ठेवून त्याचे दहन करा. काही दिवस असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.