Astro Tips For Nazar Dosh: मुलांना वारंवार नजर लागत असल्यास हे उपाय करून पहा

Astro Tips For Nazar Dosh: मुलांना वारंवार नजर लागत असल्यास हे उपाय करून पहा
Dainik Gomantak

नजर उतरविण्याची परंपरा भारतातच नव्हे तर जगभरात वर्षानुवर्षे सुरू आहे. एखाद्या व्यक्तीचे कामात होत असलेल्या प्रमोशनपासून घर, दुकान, नोकरी अशा अनेक गोष्टींवर लोकांची वाईट नजर (Nazar Dosh) असते. लहान मुलांना तर नेहमी नजर लागत असते, त्यामुळे ते आजारी पडतात, काही खात नाहीत, चिडचिड करतात. नवजात बालकांच्या बाबतीतही असे होते. मुलांना वारंवार नजर लागत असल्यास यावर ज्योतिषशास्त्रात (Astrology) अनेक उपाय सांगितले आहेत.

Astro Tips For Nazar Dosh: मुलांना वारंवार नजर लागत असल्यास हे उपाय करून पहा
Goa Congress: प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर दिल्लीला रवाना

लाल मिर्ची (Red Chillies)

लाल मिर्चीच्या वापर करून लहान मुलांची नजर काढण्याची परंपरा फार जुनी आहे. ज्योतिष शास्त्रात याचे वर्णन खात्रिलायक उपाय असा करण्यात आलाय. ज्योतिष शास्त्रानुसार मुलावर लाल मिर्चीचा धूर करून तीनदा मुलावरून ओवाळून टाकावी. यामुळे हळूहळू मुलाला लागलेली नजर कमी होईल.

मुलं जर वारंवार चिडचिड करत असतील

लहान जर मुल चिडचिड करत असतील किंवा सतत रडत असतील, तर तांब्याच्या भांड्यात पाणी आणि फुले ठेवा आणि ते मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 11 वेळा ओवाळून काढा. नंतर हे पाणी एका भांड्यात ठेवा.

Astro Tips For Nazar Dosh: मुलांना वारंवार नजर लागत असल्यास हे उपाय करून पहा
Allu Arjun Pushpa: अल्लु अर्जुनचा भाव वाढला! पुष्पा-2 घेणार एवढे मानधन

मुलाची प्रगती होत नसल्यास

मुलाची प्रगती होत नसल्यास तुरटी आणि मोहरी सात वेळा मुलावरून काढून जाळून टाका. यामुळे मुलाच्या प्रगतीवर होत असलेल्या वाईट नजरेचा प्रभाव दूर होतो.

मूल दूध पीत नसेल तर

तुमचे मूल दूध पीत नसेल, रडत असेल आणि चिडचिड करत असेल, तर त्यासाठी शनिवारी कच्चे दूध सात वेळा बाळावरून ओवाळत एका भांड्यात घेऊन कुत्र्याला पाजावे.

Astro Tips For Nazar Dosh: मुलांना वारंवार नजर लागत असल्यास हे उपाय करून पहा
पोम्बुर्फा येथे 17 वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com