Astro Tips For Rakhi: तूळ राशीला पिवळा, कन्यासाठी हिरवा, राखी बांधताना राशींच्या रंगांनुसारच बांधा

ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांना कोणत्या रंगाची राखी बांधावे हे जाणून घेऊया.
Astro Tips For Rakhi
Astro Tips For RakhiDainik Gomantak
Published on
Updated on

Astro Tips For Rakhi: भावाबहिणीचा सण म्हणून ओळखला रंक्षाबधन यंदा ३० ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधते. बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याच्या कामना करतात.

प्रेमाच्या धाग्याला बांधून आयुष्यभर बहिणींचे रक्षण करण्याचे वचन भाऊ बहिणीला देतो. बाजारपेठ देखील रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत.

पण जर तुम्हाला रक्षाबंधन तुमच्या बावासाठी अधिक शुभ बनवायचा असेल तर आणि त्याच्या आयुष्यात समृद्धी हवी असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांना कोणत्या रंगाची राखी बांधावे हे जाणून घेऊया.

असे म्हणतात की महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्णाने राजा शिशुपालाचा सुदर्शन चक्राने वध केला, त्यामुळे त्यांच्या बोटातून रक्त वाहू लागले.

तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीचा एक तुकडा फाडून त्यांच्या बोटावर बांधला. यानंतर श्रीकृष्णाने द्रौपदीला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे वचन दिले.

राजा बळीची भक्ती आणि दानावर प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णू त्याला पाताळचा राजा बनवतात आणि त्याला वरदान मागायला सांगतात. यावर बळी राजाने विष्णूकडून रात्रंदिवस त्यांच्यासमोर राहण्याचे वचन घेतले.

बराच वेळ देव वैकुंठाला परतले नाही तेव्हा लक्ष्मीजींनी देवर्षी नारदांकडे मदत मागितली. त्यांनी दिलेल्या उपायानुसार लक्ष्मीजींनी राजा बळीला संरक्षण धागा बांधून आपला भाऊ बनवले आणि श्रीविष्णूला त्याच्यापासून मुक्त केले.

कितीही कथा असोत पण सगळ्यांचा संदेश एकच असतो की भावनांमध्ये खूप ताकद असते. राखी ही केवळ पवित्र भावनांशी संबंधित असलेली एक शक्ती आहे, ज्यामुळे एखाद्याला हे जाणवते की कठीण परिस्थितीतही भावाला बहिणीच्या सन्मानाचे रक्षण करावे लागते.

Raksh Bandhan 2023
Raksh Bandhan 2023Dainik Gomantak
Astro Tips For Rakhi
Raksha Bandhan 2023: चेहऱ्यावरचा डलनेस दूर करण्यासाठी घरीच बनवा डी-टॅन फेसपॅक

ज्योतिषशास्त्रानुसार भावाला राशीनुसार कोणती राखी बांधावी

  • मेष

या राशीच्या लोकांसाठी पूर्व दिशा शुभ असते. तसेच लाल, पिवळा, हिरवा आणि सोनेरी रंगाची राखी बांधाणे शुभ मानले जाते.

  • वृषभ

ही राशी दक्षिण दिशेला बलवान आहे. या राशीच्या लोकांना पांढरी, सोनेरी आणि पिवळ्या रंगाची राखी शुभ असते.

  • मिथुन

ही रास पश्चिम दिशेला मजबूत असते. बहिणींनी हिरवी, पिवळी आणि सोनेरी रंगाची राखी बांधावी.

Zodiac
ZodiacDainik Gomantak
  • कर्क

ही रास उत्तर दिशेला बलवान आहे. या राशीच्या लोकांना पांढरी किंवा फिकट पिवळी राखी बांधावी.

  • सिंह

ही रास पूर्व दिशेला शक्तिशाली आहे. या लोकांसाठी लाल आणि सोनेरी पिवळा रंग शुभ मानला जातो.

  • कन्या

ही रास असलेल्या लोकांना हिरवा, सोनेरी आणि पिवळ्या रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते.

  • तूळ

ही रास पश्चिम दिशेला मजबुत असते. या राशीच्या लोकांना पिवळ्या, सोनेरी, पांढर्‍या आणि आकाशी निळ्या रंगाची राखी बांधा.

Rakhi
RakhiDainik Gomantak
  • वृश्चिक

ही राशी उत्तर दिशेला शुभ आहे. या राशीच्या लोकांना हिरवा, पिवळा, पांढरा आणि गुलाबी रंगाची राखी बांधा.

  • धनु

ही रास पूर्व दिशेला बलवान आहे. या राशीच्या लोकांना पिवळ्या, हिरव्या, लाल, सोनेरी रंगाची राखी बांधावी.

  • मकर

आकाशी रंगाची आणि बहुरंगी राखी बांधणे शुभ मानले जाते. ही रास उत्तर दिशेला बलवान आहे.

  • कुंभ

ही राशीच्या लोकांना निळ्या, पिवळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची राखी बांधणे शुभ मानतात

  • मीन

ही रास उत्तर दिशेला बलवान आहे. या राशीच्या लोकांना सोनेरी आणि पिवळ्या रंगाची राखी बांधणे सुभमानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com