De-Tan Face Pack For Glowing Skin: रक्षाबंधन हा सण भावाबहिणीचा सण म्हणून ओळखला जातो. यंदा हा ३० ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. पण चेहऱ्यावरचा टॅन कमी कराचा असेल तर घरीच डी-टॅन पॅक बनवू शकता. यामुळे त्वचेवरील काळे डाग कमी होवून चेहरा चमकदार दिसेल.
मुलतानी माती आणि एलोव्हेरा जेल
हा फेसपॅक बनवण्यासाठी मुलतानी माती आणि एलोव्हेरा जेल चांगले मिक्स करावे. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. 10 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करावे.
एलोव्हेरा,मध आणि हळद
हा फेसपॅख बनवण्यासाठी हे तिन्ही पदार्थ एकत्र करावे. स्मुथ पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. यामुळे चेहऱ्यावरचा टॅन कमी होतो. 10-15 मिनिटं असेच राहू द्यावे. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. आठवड्यातुन एकदा हे पॅक लावावे.
मिल्क पावडर, मध, लिंबु
हा डी-टॅन फेसपॅक बनवण्यासाठी मध, मिल्क पावडर,लिंबु चांगले मिक्स करावे. हे पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटं ठेवावे. नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. यामुळे चेहऱ्याचा डलनेस कमी होईल.
टोमॅटो फेसपॅक
हा फेसपॅक बनवण्यासाठी टोमॅटोची बारिक पेस्ट तयार करावी. पहिले चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. नंतर टोमॅटो पेस्ट चेहऱ्यावर लावावी. 15 मिनिटं तसेच राहू द्यावे. नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. असे आठवड्यातून दोनवेळा केल्यास चेहरा चमकदार होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.