....म्हणून 1 एप्रिल ला साजरा केला जातो 'April Fools Day'

1 एप्रिल हा दिवस दरवर्षी April Fools Day म्हणून साजरा केला जातो.
April Fools Day, Why do we celebrate april fools day, april fools day history
April Fools Day, Why do we celebrate april fools day, april fools day historyDainik Gomantak

'एप्रिल फूल डे' ला फक्त एक दिवस बाकी आहे. हा दिवस दरवर्षी 1 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना कोणत्याना कोणत्या मार्गाने एप्रिल फूल बनवून "एप्रिल फूल!" च्या शुभेच्छा देतात. तसेच एखाद्याला एप्रिल फूल बनवल्यावर "एप्रिल फूल!" असे मोठ्याने ओरडण्याची परंपरा आहे जे लोक अजूनही पाळतात. 'एप्रिल फूल डे' (April Fools Day) चा उगम कुठे झाला? आणि आपण दरवर्षी तो का साजरा (Celebrate) करतो? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. (Why do we celebrate april fools day?)

* 'एप्रिल फूल डे' चा इतिहास

'एप्रिल फूल डे' ची सुरुवात सर्वात प्रसिद्ध कथेनुसार झाली आहे. जुन्या काळात रोमन लोक नवीन वर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यापासून करत असत. तर मीडिल युरोपमध्ये नवीन वर्षाचा उत्सव 25 मार्च रोजी साजरा केला गेला. परंतु 1852 मध्ये पोप ग्रेगोरी आठवे यांनी ग्रेगोरियन कॅलेंडर जाहीर केले. त्यानंतर जानेवारी महिन्यात नवीन वर्षाची सुरुवात झाली. ग्रेगोरियन कॅलेंडर हे फ्रान्सने (France) पहिल्यांदा स्वीकारले होते. परंतु लोकांच्या मते, युरोपमधील बर्‍याच देशांनी हे कॅलेंडर स्वीकारले नाही. यामुळे लोक नवीन कॅलेंडरच्या आधारे नवीन वर्ष साजरे करू लागले. नवीन कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करणारे लोक जुन्या मार्गाने नवीन वर्ष साजरे करणारे लोक मूर्ख समजले गेले आणि त्यानंतर एप्रिल फूल म्हणून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

April Fools Day, Why do we celebrate april fools day, april fools day history
Yummy Oats: सकाळच्या नाश्त्यात घ्या ओट्सपासून बनलेल्या चवदार पदार्थांचा आनंद

एप्रिल फूल दिवसाचे महत्त्व

या दिवशी लोक मजा करण्यासाठी त्यांच्या मित्रांना एप्रिल फूल बनवतात. हा असाच एक दिवस आहे जो जागतिक स्तरावर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. 'एप्रिल फूल दिवस' अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. युक्रेनमधील ओडेसा येथे हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये एप्रिल फूल दिवस फक्त दुपारपर्यंत साजरा केला जातो. तर जपान, रशिया, आयर्लंड, इटली आणि ब्राझीलमध्ये संपूर्ण दिवस साजरा केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com