Yummy Oats: सकाळच्या नाश्त्यात घ्या ओट्सपासून बनलेल्या चवदार पदार्थांचा आनंद

रोज एकच ओट्स खाऊन कंटाळले असाल तर जाणून घेऊया ओट्सचे अनेक प्रकार कोणते आहते.
healthy breakfast Recipes, Simple breakfast Recipes, oats recipes with milk, simple oats recipe, oats recipes for weight loss
healthy breakfast Recipes, Simple breakfast Recipes, oats recipes with milk, simple oats recipe, oats recipes for weight lossDainik Gomantak
Published on
Updated on

अनेकांना सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवावे हा प्रश्न पडतो. ज्या लोकांना सकाळी ऑफिसला जायची धावपळ असते अशाना रोज सकाळी काय बनवावे प्रश्न पडला असेल तर आम्ही तुम्हाला ओट्सचे विविध प्रकार सांगणार आहोत. जे चवदार , आरोग्यदायी (Healthy) आणि झटपट तयार होणार आहेत. (Healthy breakfast Recipes)

* स्ट्रॉबेरी ओट्स (Simple oats recipe- strawberry oats)

उन्हाळ्यात हंगामी फळे भरपूर मिळतात. यामुळे स्ट्रॉबेरी देखील बाजारात भरपूर प्रमाणात मिळू शकते. स्ट्रॉबेरी ओट्स बनवण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि खजूरांसह ओट्स दह्यामध्ये भिजवावे. आणि याहे सेवन करण्यापूर्वी अंबाडीच्या बिया वरुण टाकून त्याचा आस्वाद घ्यावा.

* सफरचंद ओट्स

सफरचंद बाराही महीने बाजारात उपलब्ध असतात. यामुळे तुम्ही सफरचंद पासून अनेक पदार्थ बनवू शकता. हे ओट्स बनवण्यासाठी सर्वात आधी सफरचंद खीसून घ्यावे आणि दूधामध्ये मिक्स करावे. यामध्ये तुम्ही दालचीनी पावडर, खजूर, मध आणि ओट्स मिक्स करावे. हे ओट्स आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

healthy breakfast Recipes, Simple breakfast Recipes, oats recipes with milk, simple oats recipe, oats recipes for weight loss
Breakfast Idea: सकाळच्या नाश्त्यात घ्या 'गोड काश्मिरी पुलावचा' आस्वाद

* चॉकलेट ओट्स

चॉकलेटची चव सर्वांच्या आवडीची असते. चॉकलेट आणि फळांसह तुमच्या ओट्सला स्वादिष्ट गोड चव मिळते. तुम्ही ड्राय फ्रूट्स, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीसह या साध्या ओट्सची चव वाढवू शकता.

* केळी ओट्स

केळी हे वर्षभर उपलब्ध असलेल्या फळांपैकी एक आहे.यामुळे तुम्ही केळीपासून अनेक पदार्थ बनवू शकता. हा ओट्स प्रकार बनवण्यासाठी तुम्ही सर्वात पहिले केळी बारीक करून घ्यावे नंतर त्यामध्ये दूध, ओट्स, कॉको पाडवर आणि ड्राय फ्रुट्स टाकू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com