Anti Aging Juice: प्रदुषण चुकीचा लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा शरीरासह त्वचेवर देखील परिणाम होतो. अनेक महिला महागडे ब्युटी प्रोडक्ट वापरतात.पण पाहिजे तसा चेहऱ्यावर सकारात्मक परिणाम दिसत नाही. पण तुम्ही काही घरगुती उपाय करून चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करू शकता. यासाठी तुम्ही काही ज्युसचे सेवन करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या ज्युसचे सेवन करावे.
काकडीचा ज्युस
काकडीच्या ज्युसमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि मिनिरल्स त्वचेसाठी फायदेशीर असतात. इतकंच नाही तर काकडीच्या ज्युसमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. तसेच त्वचेवरचे डाग देखील कमी होतात.
डाळिंबाचा ज्युस
डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट मुबालक प्रमाणात असते. डाळिंब खाणे शरीरसह त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. डाळिंबाच्या ज्युसमध्ये नैसर्गिकरित्या अँटीमायक्रोबियल असतात. जे त्वचा चमकदार बनवण्यासाठी मदत करते. तसेच मुरूम देखील कमी करतात.
लिंबु पाणी
लिंबुमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीरासह त्वचेसाठी लिंबुपाणी फायदेशीर असते. यामुळे नियमितपणे लिंबु पाणी प्यायल्याने पोट स्वच्छ होऊन चेहऱ्यावर चमक येते.
दुधी भोपळा
दुधी भोपळ्याचा ज्युस आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पाणी, व्हिटॅमिन सी, के आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी त्वचेच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होतात. तसेच मुरूमाची समस्या कमी होते.
टोमॅटो
टोमॅटोच्या ज्युसमध्ये कॅरोटीनोइड्स मोठ्या प्रमाणात असते. जे त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. एवढेच नाही तर तीव्र सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण करते. याशिवाय टोमॅटोचा ज्युस नियमितपणे प्यायल्याने सुरकुत्या कमी होतात. टोमॅटो ज्यूस पिण्यासोबतच त्याची पेस्ट त्वचेवर लावल्याने टॅनिंगची समस्याही दूर होते.
टरबूज
टरबूजच्या ज्युसमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. मुबलक प्रमाणात पाणी पिणे त्वचेसाठी आरोग्यदायी असते. त्वचेमध्ये ओलावा असल्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज दिसत नाही. याशिवाय टरबूजच्या ज्युसमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असते. यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होऊन त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.