Anant Ambani Weight Loss : अनंत अंबानींनी तब्बल 100 किलो वजन केलं कमी; कसं ते जाणून घ्यायचं असेल एकदा हे वाचाच

आई नीता अंबानी यांच्यासोबत व्यायाम करून 100 किलोपेक्षा जास्त वजन कमी केले.
Anant Ambani Weight Loss
Anant Ambani Weight LossDainik Gomantak

तुम्हाला माहिती आहे का की, एकेकाळी अनंत अंबानींचे वजन 170 किलोपेक्षा जास्त होते. त्यांनी आई नीता अंबानी यांच्यासोबत व्यायाम करून 100 किलोपेक्षा जास्त वजन कमी केले. त्यासाठी त्यांनी फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांच्या देखरेखीखाली फिटनेसचा प्रवास सुरू केला. अनंत अंबानींचा फिटनेस मंत्र जाणून घेऊया. (Anant Ambani Weight Loss Journey)

Anant Ambani Weight Loss
Bad Cholesterol Food : सावधान! या गोष्टी शरीरात वाढवतात कोलेस्टेरॉलचे प्रमाण; वेळीच करा बदल

वास्तविक, अनंत अंबानी यांच्या दीर्घकालीन दम्यामुळे त्यांना खूप जास्त डोस आणि स्टेरॉईड्स देण्यात आले होते. त्यामुळे त्याचे वजन खूप वाढले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीता म्हणाल्या होत्या की, कोणतेही मूल त्याची आई जे करते तेच फॉलो करते. त्यामुळे मुलगा अनंतचे वजन कमी करण्यासाठी त्यांनी डाएटिंग सुरू केले. हे पाहून अनंतनेही सकस आहार घेण्यास सुरुवात केली. अनंतचे वजन कमी करण्यामागे कोणते महत्त्वाचे घटक होते ते जाणून घ्या.

  • चालणे

अनंत अंबानींनी वजन कमी करण्यासाठी चालण्यासोबतच व्यायामाला सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की,ते स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दररोज 21 किमी चालत असे. वजन कमी करण्यासाठी त्यानी नैसर्गिक प्रक्रियेचे पूर्णपणे पालन केले.

  • व्यायाम

अनंत अंबानी त्यांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात 5-6 तास जड व्यायाम करत असत. त्याच्या दिनक्रमात योग, वजन प्रशिक्षण, कार्यात्मक प्रशिक्षण, उच्च तीव्रता आणि कार्डिओ या सर्व गोष्टींचा समावेश होता. त्यांनी आपल्या आहारात साखर अजिबात घेतली नाही.

  • सायकलिंग

एका मुलाखतीत त्याचे प्रशिक्षक विनोद चन्ना यांनी सांगितले की, अनंतसाठी कठोर आहार चार्ट आणि वर्कआउट रूटीन तयार करण्यात आला होता. अनंतने जास्त तीव्रतेचे वर्कआउट केले, जसे की वेगाने सायकल चालवणे आणि चालणे इ. त्याचे सत्र अँटिलियामध्येच रात्री उशिरापर्यंत चालायचे.

  • आहार

प्रशिक्षकाच्या म्हणण्यानुसार, अनंतच्या आहारात भरपूर स्प्राउट्स, सूप आणि सॅलड्सचा समावेश होता. जंक फूडऐवजी प्रोटीन फूड, हाय फायबर फूड आणि लो कार्ब फूडचा समावेश करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com