Tips For Faster Hair Growth: केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल 'हे' हिरवं पाणी; असा करा वापर

केसांच्या वाढीसाठी आवळ्याचे पाणी खुप फायदेशीर असते.
Tips for hair grow faster
Tips for hair grow fasterDainik Gomantak
Published on
Updated on

Tips For Faster Hair Growth: त्वचेप्रमाणे केसांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. सध्या लांब केसांची फॅशन आहे. अनेक मुली केस वाढवण्यासाठी अनेक उपाय करत असतात. अनेक महागडे प्रोडक्ट वापरतात. पण पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही.

जर तुम्हालाही केस वाढवण्यची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केसांच्या मुळात आवळ्याचे पाणी लावल्यास अनेक फायदे होतात. आवळ्यामध्ये आढळणारे पोषक तत्व केसांना मजबुत करण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेउया की आवळ्याचे पाणी कसे वापरावे.

  • आवळ्याचे पाणी कसे वापरावे

आवळ्याचे पाणी (Amla Water) बनवण्यासाठी 1 ते 2 चमचे वाळलेल्या आवळ्याची पावडर पाण्यात उकळावी. पावडर नसेल तर 2 ते 4 आवळा पाण्यात उकळावे. नंतर पाणी गाळून थंड करून घ्यावे. यानंतर केसांच्या मुळात लावावे.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि आयरन मुबलक प्रमाणात असते. हे घटक केसांना निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असते. तसेच यामुळे केसांची चमक कायम राहते. ज्यांचे केस ड्राय आहेत त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम आहे.

Tips for hair grow faster
Benefits of Moisturizer on Skin: मॉइश्चरायझर लावताना तुम्हीही 'या' चुका करताय? मग ही बातमी वाचाच
Amala Juice
Amala Juice Dainik Gomantak

खराब केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवळ्याचे पाणी फायदेशीर असते. यामुळे केस गळणेही कमी होउ शकते. याशिवाय जर तुमच्या केसांमध्ये पांढरे केस येण्यास सुरुवात झाली असेल तर ती समस्या देखील कमी होउ शकते. हो उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा लावल्यास केसांच्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर ठरते.

तुम्ही आवळा- कँडी, लोणचे आणि चटणीच्या स्वरूपात देखील सेवन करू शकता. यामुळे तुमचे केसच नव्हे तर तुमची त्वचा देखील सुधारेल. तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. त्यामुळे आजच या औषधी फळाचा (Fruits) आपल्या आहारात आणि केसांची निगा राखण्याच्या दिनचर्येत समावेश करावा.

आवळ्याचे इतर फायदे

  • वजन कमी होते

रिकाम्या पोटी आवळ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. ते कॅलरीज जलद बर्न करण्याचे काम करते. हे चयापचय गतिमान करते. हे जलद वजन कमी करण्यास मदत करते.

  • डोळ्यांच्या आरोग्यासाठी

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असते. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते. ते अंधत्व आणि मॅक्युलर डिजेनेरेशन सारख्या डोळ्यांशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करतात.

  • त्वचेसाठी फायदेशीर 

आवळा पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्वचेशी संबंधित समस्या जसे की मुरुम आणि डाग दूर करण्यात मदत होते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com