Aloe Vera Juice Benefits: रोज कोरफड खाल्ल्याने 'हे' आजार होतील गायब!

Korfad Che Fayde: याबरोबरच कोरफडीचा ज्यूसदेखील पिणेदेखील उपयुक्त ठरते.
Aloe Vera
Aloe VeraDainik Gomantak
Published on
Updated on

Health benefits of aloe vera juice

घरच्या परसबागेत असणाऱ्या अनेक वनस्पती आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. तुळस, कडूनिंब याबरोबरच कोरफड हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक अशी वनस्पती आहे. आपण आपल्या त्वचेसाठी तसेच आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी कोरफडीचा वापर करतो.

याबरोबरच, केसातील कोंडा घालवण्यासाठी घालवण्यासाठीदेखील कोरफडीच्या गराचा वापर केला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का, कोरफडीच्या बाह्य वापराबरोबरच कोऱफडीचे सेवन केल्यामुळेदेखील आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. काही आजार कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊयात, कोरफडीचा ज्यूस पिल्याने आपल्या आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत.

1. मधूमेहापासून सुटका

अनेकजण मधूमेहामुळे त्रस्त असतात. मधूमेह असलेल्या व्यक्तींना अनेक खाद्यपदार्थ खाण्यास बंदीदेखील असते. रक्तातील साखर नियंत्रित राहावी यासाठी कोरफडीचा गर खाल्ला जाऊ शकतो. याबरोबरच कोरफडीचा ज्यूसदेखील पिणेदेखील उपयुक्त ठरते.

Aloe Vera
Tips For Sweat: घामाच्या वासाने हैराण झाला आहात का? तर मग फॉलो करा या टिप्स

2. कॅन्सरचा धोका कमी

कोरफडीचे कोणत्याही स्वरुपात नियमित सेवन केल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो, असेदेखील म्हटले जाते.

3. हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी

आपल्या हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. व्यायाम, चौरस आहाराबरोबच कोरफडीचे सेवन करणे तुमचे हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.

4. व्हिटॅमीन सी

कोरफड ही व्हिटॅमीन सीचा महत्वाचा स्रोत आहे.

Aloe Vera
Hair Care Tips: उन्हाळ्यात आपल्या केसांची काळजी अशी घ्या काळजी

5. वजन कमी करण्यासाठी

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी करफडीच्या गराचे सेवन करु शकता.

6. पचनप्रक्रिया सुरळित राहण्यासाठी

जर तुम्हाला पचनप्रकिया सुरळित ठेवायची असेल तर तुम्ही कोरफडीच्या ज्यूसचे नियमित सेवन करु शकता.

महत्वाचे म्हणजे, केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण कोरफडीचा गर चेहऱ्याला किंवा केसाला लावतो. जर तुम्ही नियमितपणे कोरफडीच्या गराचे किंवा ज्यूसचे सेवन करत असाल तर त्यातील पोषकतत्वे तुम्हाला शरीरातून मिळतात आणि तुमच्या इतर समस्या कमी होतात.

टीप - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com