AirPods Cleaning Tips: एअरपॉड्स या आधुनिक युगात गरजेची वस्तु बनली आहे. फोनवर बोलण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, ऑनलाइन मिटिंग जॉइन करण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच त्याच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. मार्केटमध्ये विविध प्रकराचे एअरपॉड्स क्लीनिंग सोल्युशन्स उपलब्ध आहेत. पण तुम्ही काही घरगुती उपाय वापरून देखील ते स्वच्छ करू शकता
सॉफ्ट कापड
सॉफ्ट कापड एअरपॉड्स स्वच्छ करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. सॉफ्ट कापडाने एअरपॉड्स हळूहळू स्वच्छ करावे. एअरपॉड्सची केस स्वच्छ करण्यासाठी, मऊ आणि कोरडे कापड वापरावे. केसच्या आत जमा झालेली धूळ स्वच्छ करण्यासाठी सॉफ्ट ब्रश वापरू शकता.
पेंट ब्रश
एअरपॉड्समधील छिद्रामधील घाण स्वच्छ काढण्यासाठी तुम्ही पेंट ब्रश वापरू शकता. चार्जिंग केस सॉफ्ट ब्रशने स्वच्छ करू शकता.
सॉफ्ट ब्रश
सॉफ्ट ब्रशचा वापर करून एइरपोड्स स्वच्छ करू शकता. एअरपॉड्सचे छिद्र सॉफ्ट ब्रशने पूर्णपणे स्वच्छ केरता येतात. एअरपॉड्स स्वच्छ करतांना जास्त जोराने करू नका. यामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.
कॉटन स्वॅब
कॉटन स्बॅबवर थोडे आयसोप्रोपाइल अल्कोहोल लावून एअरपॉड्स साफ करू शकता. यामुळे एअरपॉड्स चांगले चमकतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.