Healthy Tips: स्वत:ला निरोगी अन् आनंदी ठेवण्यासाठी करा 'या' 5 गोष्टी

Top 5 Healthy Tips: तुम्हाला जर या पाच सवयी असेल तर तुम्ही स्वत:ला निरोगी अन् आनंदी ठेऊ शकता.
Healthy Tips
Healthy Tips Dainik Gomantak

Top 5 Healthy Tips: सध्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:ला आनंदी आणि निरोगी ठेवणे अवघड झाले आहे. सतत काम आणि स्ट्रेसमुळे मेंदु आणि शरीर थकुन जाते आणि अनेक आजारांना व्यक्ती बळी पडतो.

जर आपण शरीराची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला मानसिक आणि शारीरीक थकवा येऊ शकतो. तुम्हाला जर या पाच सवयी असेल तर स्वत:ला निरोगी अन् आनंदी ठेऊ शकता.

  • पोषक आहार आणि पुरेसे पाणी

शरीराला पुरेसे पाणी पिणे आणि पोषक आहार घेणे महत्त्वाचे आहे. पाणी प्यायल्याने मेंदूतील रक्त प्रवाह सुधारतो जो मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक आहे.

फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांसारखे निरोगी पदार्थ मेंदूला पोषक तत्त्वे देतात. मेंदूसाठी योग्य आहारही गरजेचा आहे. 

  • योगा

निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. ज्यामुळे मेंदूला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा होतो. व्यायामामुळे मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो.

ज्यामुळे मेंदू फ्रेश राहतो.  तसेच आपला मुड देखील सुधारतो. स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात त्यामुळे मन शांत राहते. 

  • मेडिटेशन

मेडिटेशन केल्याने मन आणि मेंदु शांत रहाते. मेडिटेशन केल्याने मानसिक शांती मिळते ज्यामुळे तणाव कमी होतो. तसेच मेडिटेशन केल्याने एकाग्रता वाढते.

त्यामुळे मेंदूची अॅक्टिव राहतो. मन शांत आणि आनंदी ठेवल्याने उत्साह, सकारात्मकता आणि आनंद वाढतो. त्यामुळे रोज मेडिटेशन करावे.

Healthy Tips
​Ginger Cultivation: घरच्या घरीच उगवा आलं; फक्त करावे लागेल हे काम
  • सोशल मिडियाला ब्रेक

सोशल मिडियापासून स्वत:ला ब्रेक दिल्याने मन निरोगी आणि आनंदी राहते. वेळोवेळी स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरमधून ब्रेक घेणे देखील महत्त्वाचे आहे. यामुळे आपला मेंदू अधिक काम करू शकेल.

फोन आणि लॅपटॉपमधून ब्रेक घेतल्याने डोळ्यांना देखील आराम मिळते. सोशल मीडियापासून दूर राहिल्याने तणाव आणि चिंता कमी होते. तसेच झोपीची समस्या देखील कमी होते.

  • स्वत:चा छंद जोपासावा

आपला आवडता छंद जोपासल्याने देखील मन आणि मेंदु आनंदी राहते. यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

चित्रकला, संगीत, नृत्य इत्यादी छंद मेंदूचे वेगवेगळे भाग अॅक्टिव करतात. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com