दिव्यांग प्रवाशांना फ्लाइटमध्ये मिळतात 'या' खास सुविधा

दिव्यांग प्रवाशांसाठी फ्लाइटमध्ये काही खास सुविधांची व्यवस्था केली जाते.
Flight
FlightDainik Gomantak
Published on
Updated on

विमान कंपन्यांनी दिव्यांगांच्या प्रवासासाठी काही विशेष मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. दिव्यांग प्रवाशांनी विमान प्रवास केल्यास त्यांना या खास सुविधांचा सहज लाभ घेता येईल. फ्लाइटमध्ये दिव्यांग प्रवाशांना कोणत्या सुविधा दिल्या जातात आणि या सुविधा कशा मिळतात हे जाणून घेऊया.

विमानतळापासून ते फ्लाइटपर्यंत बसण्याची सोय

विमान कंपनी अपंग प्रवाशांना डिपार्चर फ्लाइटपर्यंत पोहोचण्यासाठी सुविधा पुरवते. यासोबतच दिव्यांग प्रवाशांना फ्लाईटमध्ये बसवण्याची आणि फ्लाइटमधून विमानतळावर सोडण्याची सुविधाही एअरलाइन्स पुरवतात. केवळ दिव्यांग प्रवाशांसाठी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एअरलाइन्स शुल्क आकारात नाही.

व्हीलचेअरची सोय

फक्त एअरलाइन्स प्रवाशांना व्हीलचेअरवर घेऊन जाण्याची परवानगी देतात. मात्र, ही माहिती तिकीट बुक करतानाच द्यावी लागते. विमान कंपन्या त्यांच्या गोष्टींची आधीच व्यवस्था करतात. ते व्हीलचेअर स्वतंत्रपणे पॅक करतात आणि फ्लाइटवर्यंत पोहोचवतात. ही जबाबदारी पूर्णपणे विमान कंपनीची असते.

  • कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात

फ्लाइटमधील सुविधांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी तिकीट काढतांना याची माहिती द्यावी. कारण त्यानुसार विमान कंपन्यांना आधीच योय करावी लागते. आधीच माहिती दिल्यामुळे विमानतळावर पोहोचल्यावर सर्व सुविधा मिळतात. जर तुम्हाला तुमच्यासाठी असिस्टंट बुक करायचा असेल तर तुम्ही पैसे देऊनही बुक करू शकता. तिकीट बुक करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com