Air Pollution Effect On Child: दिवसेंदिवस वाढतंय हवेचं प्रदूषण; लहान मुलांना होतो अधिक त्रास! अशी घ्या काळजी

लहान मुलांचा प्रदुषणापासून बचाव करायचा असेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.
Air Pollution Effect On Childs
Air Pollution Effect On ChildsDainik Gomantak
Published on
Updated on

Air Pollution Effect On Child: बदलत्या हवामानासोबतच वायु प्रदुषणात वाढ होत आहे. या विषारी हवेमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. या हवेमुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. या प्रदूषित हवेमध्ये धूळ आणि धूर यांचा समावेश होतो, ज्यामुळे मुलांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. मुलांमध्ये, खोकला सर्दीपासून न्यूमोनिया आणि ब्रॉन्किओलायटीस, ब्रॉन्किओल्सची जळजळ या रोगांचा धोका वाढवतो. त्याच वेळी, दीर्घकाळापर्यंत वायू प्रदूषणामुळे, हृदय आणि फुफ्फुसांवर देखील परिणाम होतो. यामुळे प्रदूषणापासून लहान मुलांचा बचाव कसा करावा हे जाणून घेऊया.

दमा किंवा श्वसनाचे आजार

प्रदूषणामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना श्वसनाचे आजार होऊ शकतात. याचे कारण म्हणजे PM 2.5, PM 10 आणि नायट्रोजन डायऑक्साइड म्हणजेच NO2 वाढल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे दम्याची समस्या वाढत आहे. इतर श्वसनाच्या आजारांचा धोकाही वाढतो. यामध्ये प्रामुख्याने ब्राँकायटिस आणि फुफ्फुसाच्या कार्यातील समस्या यांचा समावेश होतो.

संसर्गाचा धोका

झपाट्याने वाढणाऱ्या वायू प्रदूषणामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागली आहे. यामुळे मुलांना न्यूमोनिया आणि ब्रॉन्कायलाइटिस सारख्या श्वसनासंबंधित आजारांचा धोका वाढत आहे.

मुलांचा विकास

प्रदूषणाच्या संपर्कात आल्यावर गर्भ विकासाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या विकास लवकर होत नाही.

फुफ्फुसाचे आरोग्य

प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होतो. यामुळे प्रदूषित वातावरणात राहिल्याने मुलांची फुफ्फुसे कमकुवत होऊ लागतात. यामुळे मुलाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

मुलांना प्रदूषणापासून कसे दूर ठेवायचे?

बाहेरील हवेची गुणवत्ता खराब असल्यास मुलांना बाहेर जाण्यापासून रोखावे.

तुम्ही मुलांना बाहेर पाठवत असाल तर त्यांना तोंडावर मास्क आणि डोळ्यांवर चष्मा लावूनच बाहेर पाठवावे. मुलांना प्रदूषणाच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी, त्यांना दररोज रात्री वाफ द्यावी.

मुलांच्या आहारात झिंक आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी लहान मुलांना योगासने करायला शिकवावे.

घरामध्ये स्वच्छता ठेवावी आणि मुलांसमोर सिगारेट ओढू नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com