90s Popular Snacks For Kids : आजचा काळ फास्ट फूडचा आहे. फास्ट फूड खाणे ही लोकांची सवय झाली आहे. पिझ्झा, बर्गरच्या आजच्या युगात 90 च्या दशकातील लोक अनेक जुन्या गोष्टींना खूप मिस करतात.
90 च्या दशकात असे अनेक खाद्यपदार्थ होते जे त्यावेळी खूप लोकप्रिय होते. लहान मुलं असोत की म्हातारे सगळेच ते मोठ्या आवडीने खात असत. आज आम्ही तुम्हाला त्या 90 च्या दशकातील असे काही जुने खाऊचे पदार्थ दाखवणार आहोत ज्यामुळे तुमच्या आठवणी नक्की ताज्या होतील. (90s Popular Snacks For Kids)
पेपरमिंट
पेपरमिंट 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय गोष्टींपैकी एक होती. पेपरमिंट टॉफी खाऊन त्यावर पाणी पिण्याची सवय त्यावेळच्या मुलांना होती. या टॉफीमुळे तोंडात थंडपणा जाणवायचा. अतिशय स्वस्त आणि चविष्ट असल्यामुळे प्रत्येकाकडे ही टॉफी असायचीच.
बुमर बबलगम
आपल्याला च्युइंगम खायला सगळ्यांनाच आवडते. 90 च्या दशकात बूमर बबलगम हे एक प्रसिद्ध च्युइंगम होते. 1 रुपयाला मिळणारे च्युइंगम आजही खूप प्रसिद्ध आहे.
लॉलीपॉप
लॉलीपॉप ही 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय गोष्टींपैकी एक होती. त्यावेळी मुले रडायला लागली तर त्यांना लॉलीपॉप देऊन गप्प केले जायचे. 90 च्या दशकात मुलं मोठ्या आवडीने हे लॉलीपॉप खायचे. यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या रंगांचे लॉलीपॉप उपलब्ध असायचे.
ऑरेंज टॉफी
संत्र्याची टॉफी कधीच खाल्ली नाही असा कुणीच नसेल. 1 रुपयाला 4 मिळणारी ही टॉफी खूप चविष्ट आहे. पूर्वी प्रत्येकाच्या खिशात ही टॉफी असायचीच असायची. विशेषत: शाळांमध्ये क्रीडाच्या तासाला मुलांना एनर्जीसाठी ही टॉफी दिली जायची.
डॉलर चॉकलेट
सोन्याच्या रंगाच्या रॅपरमध्ये असलेले चॉकलेट त्यावेळेच्या सर्वांचेच आवडीचे असायचे. त्यावर डॉलरचे चिन्ह असायचे, किंवा वेगवेगळे लहान मुलांचे चित्र असायचे. पण डॉलर चॉकलेट म्हणूनच ही candy त्यावेळी आणि आताही प्रसिद्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.