राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'संसद रत्न' खासदार सुप्रिया सुळे

आपल्या कर्तृत्वाने संसदभवन गाजवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या आयुष्यातील काही खास क्षण.
खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटूंब
खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटूंबFacebook/@Supriyasule
Published on
Updated on

महाराष्ट्राच्या धडाडीच्या महिला खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचा हुशार चेहरा, राजधानी दिल्लीत आपल्या कर्तृत्वाने संसदभवन गाजवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा आज जन्मदिवस आहे. उत्कृष्ट वक्तृत्वशैलीने त्यांनी बारामती मतदारसंघात एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. त्यांनी राजकारणासोबतच आपल्या कुटूंबाची धुराही उत्तम पध्दतीने सांभाळली आहे.

Supriya Sule With her Family
Supriya Sule With her FamilyFacebook/ Supriya Sule

एक महिला राजकारणी म्हणून त्यांनी आज नावलौकीक मिळवला आहे. जन्म 30 जून 1969 रोजी पुण्यात झाला होता. सुप्रिया सदानंद सुळे या महाराष्ट्रातील एक सक्रिय राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्या मुलगी असून त्यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी बारामती संघातून लोकसभा निवडणूक जिंकली.

Supriya Sule
Supriya SuleFacebook/ Supriya Sule

सुप्रिया सुळे यांचे ठाकरे घराण्याशीही खास संबध आहे. याचचं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदारकी लढवत होत्या त्यावेळी बाळासाहेबांनी सेनेचा उमेदवार दिला नव्हता. अनेक वेळा त्यांना ठाकरे घराण्याचे सुपुत्र आणि आताचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधतांना बघायला मिळतं.

Supriya Sule with Aaditya Thackeray
Supriya Sule with Aaditya ThackerayFacebook/ Supriya Sule

सुप्रिया सुळे यांनी मायक्रोबायोलॉजीची पदवी घेतली आहे. त्या राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी वैज्ञानिक ब्लॉकमध्ये कार्यरत होत्या. त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये काही वेळ घालवला, जेथे त्यांनी यूसी बर्कले येथे जल प्रदूषणाचा अभ्यास केला आहे.

Supriya Sule
Supriya SuleFacebook/ Supriya Sule

दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या खासशैलित शुभेच्छा दिल्या आहेत. तर धनंजय मुंडे आणि रोहित पवार यांनीही सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसाला खास ट्विट करत फोटो शेअर केले आहे.

Supriya Sule with Sanjay Raut
Supriya Sule with Sanjay RautTwitter/@supriya_sule

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com