राफेल नदाल: टेनिसमधील आणखी एक युग संपुष्टात आले आहे. गुरुवारी (10 ऑक्टोबर) चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली.
निवृत्ती: 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालनं टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. हा हंगाम त्याचा शेवटचा असणार आहे. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली.
डेव्हिस कप: या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या डेव्हिस कपच्या अंतिम फेरित प्रवेश करणार असल्याचे नदालने सांगितलं.
काय म्हणाला नदाल: डेव्हिस कप फायनल ही माझी शेवटची स्पर्धा असेल. ज्यात मी देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे. यासाठी मी खूप उत्सुक आहे.
कल्पनेपेक्षा मोठी कारकिर्द: माझ्या कल्पनेपेक्षा मोठी आणि खूप यशस्वी कारकीर्द संपवण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही नदालने नमूद केले.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात: वयाच्या 12व्या वर्षांपर्यंत तो टेनिस आणि फुटबॉल दोन्ही खेळ खेळत असे. पण, पुढे जाऊन याच पोराने टेनिस जगताला आपलेसे केले.
काकांचा सल्ला: नदाल काका टोनी नदाल यांच्या सल्ल्यानुसार या क्षेत्रात आला आणि त्याने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर इतिहास घडवला.
सर्वाधिक वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारे टेनिसपटू: 24-नोवाक जोकोविच, 22-राफेल नदाल, 20-रोजर फेडरर, 14-पीट सेम्प्रास, 12-रॉय एमर्सन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.