ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात त्याची निवड करण्यात आली. पण त्याने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.
ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात त्याच्या जागी दुसरा खेळाडू निवडावा लागेल. स्टॉइनिस सध्या SA20 मध्ये डर्बन सुपर जायंट्सकडून खेळत आहे.
स्टॉइनिस 2023 मध्ये भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात तो ऑस्ट्रेलियाच्या विजेत्या संघाचा भाग होता. ऑस्ट्रेलियाकडून व्हाईट बॉल क्रिकेट खेळणारा स्टॉइनिस आता केवळ टी-२० क्रिकेट खेळणार आहे.
मार्कस स्टॉइनिस त्याच्या कारकिर्दीत ७१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ६४ डावांमध्ये त्याने २६.६९ च्या सरासरीने १४९५ धावा केल्या, ज्यामध्ये १ शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
एकदिवसीय सामन्यात स्टॉइनिसची सर्वोच्च धावसंख्या १४६* धावा आहे. याशिवाय, ६४ डावांमध्ये गोलंदाजी करताना, स्टोइनिसने ४३.१२ च्या सरासरीने ४८ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये त्याचा सर्वोत्तम आकडा ३/१६ होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.