जेमिमाह रॉड्रिग्स सध्या चांगलीच चर्चेमध्ये आली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर किंवा स्मृती मानधना सारखी 'पॉवर हिटर' बनण्यासाठी तिला तिच्या खेळात बदल करण्याची काही गरज वाटत नाही.
बार्बाडोसविरुद्धच्या सामन्यानंतर जेमिमाने सांगितले की, 'स्मृती 2019 मध्ये आयपीएल महिला T20 चॅलेंज दरम्यान म्हणाली होती की हरमनप्रीत कौर किंवा स्मृती मानधना बनण्याचा प्रयत्न करू नको, तू जेमिमा रॉड्रिग्स आहेस. मला वाटते की, तु भूमिका समजली आहे आणि त्यामुळे मला खूप मदत होत आहे.
लोक तिच्या खेळाबद्दल काय विचार करतात हे जेमिमाला काही फरक पडत नाही तसेच पुढे जेमि म्हणते, 'टीमने मला एक भूमिका सोपवली आहे, जर मी ती भूमिका करू शकलs तर लोक त्याबद्दल काय विचार करतात याचा काही फरक पडत नाही. जर त्याचा संघाला फायदा होत असेल तर आमच्याकडे शफाली वर्मा, स्मृती आणि हरमन आहेत आणि त्यामुळे मी संघासाठी सर्वोत्तम भूमिका बजावू इच्छिते.
जेमिमा रॉड्रिग्सने कबूल केले की ती 'पॉवर हिटर' नाही परंतु खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अधिक योगदान देण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहे.
जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली की, 'नक्कीच मी माझ्या पॉवर गेमवर काम करत आहे पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे मला माझा खेळ समजला आहे मी पॉवर हिटर नाही पण मी एक किंवा दोन धावा घेण्याइतके चांगले शॉट्स खेळू शकते. मला धावा कशा करायच्या हे माहित आहे, मला वाटते की ही माझी सर्वात मजबूत बाजू आहे.'
पुरेसे षटकार न मारताही ती आपला स्ट्राइक रेट कायम राखू शकेल असा आत्मविश्वास जेमिमाला आहे पुढे ती म्हणाली की, 'माझा खेळ फारसा आकर्षक नाही पण त्याशिवायही मी चांगला स्ट्राइक रेट कायमच राखू शकते. त्यामुळे मला कळले की मला कोणाचेही अनुकरण करण्याची कोणतीही गरज नाही. धावा काढण्यासाठी मला जेमिमा रॉड्रिग्ज व्हावं लागेल यामुळे मला मदत झाली आहे.'
जेमिमाने प्रशिक्षक रमेश पवार यांच्याशी झालेल्या संभाषणाबद्दलही सांगितले ज्यांनी फलंदाजीला उतरण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर राहण्यास सांगितले होते. पुढे ती म्हणाली की, 'रमेश सरांनी मला शेवटच्या सामन्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार राहण्यास सांगितले होते आणि खरे सांगायचे तर, जेव्हा मी तयारी करत होतो, तेव्हा मी माझ्या दोन्ही भूमिकांसाठी तयारच होतो.'
जेमिमा म्हणाली की, 'पण अर्थातच मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते आणि मला आनंद आहे की मला या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली आणि मी माझ्या रणनीतीनुसार योगदान दिले आहे. तसेच याचा फायदा संघालाही झाला आहे.
जेमिमा रॉड्रिग्स तिच्या फावल्या वेळेत गिटार देखील वाजवते. तिला गिटार वाजवायला आणि गाणे म्हणायला आवडते. गिटार वाजवतानाचे त्याचे व्हिडिओ आणि फोटो त्याने सोशल मीडियावर अनेकदा शेअर करण्यात आले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.