Goa Assembly Session: प्रश्नोत्तरे, ठराव, आश्वासने! पहा गोव्याच्या विधानसभा अधिवेशनाचे काही खास फोटो..

Goa Assembly Session: प्रश्नोत्तरे, ठराव, आश्वासने! पहा गोव्याच्या विधानसभा अधिवेशनाचे काही खास फोटो..
Published on
Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025

‘कुंकळ्ळी’तील समस्या सोडवू; आरोग्यमंत्री राणे

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत परिसरातील आरोग्‍याच्या समस्यांची पाहणी व उपाययोजना आरोग्य खाते करेल, असे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत शून्य तासाला दिले.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025

‘कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत विचार करा’; सरदेसाई

कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्याचा विषय तपासून पाहू, असे उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी शून्य तासाला हा विषय उपस्थित केला होता.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025

किनारी भागातील आरोग्यसेवा सुधारावी; आरोलकर

मांद्रे मतदारसंघातील किनारी भाग हा पर्यटन क्षेत्र आहे. त्या परिसरातील आरोग्य उपकेंद्रांत २४ तास किमान परिचारिका तरी उपलब्ध असाव्यात, अशी मागणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी विधानसभेत केली.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025

सांताक्रुझ भागात दुर्गंधी; फर्नांडिस

सांताक्रुझ येथे महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे पाणी साचून राहत आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसर दुर्गंधीमय झाला आहे. महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा उपद्रव होण्याची भीती सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी शून्य तासाला व्यक्त केली.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025

युरी-माविन यांच्यात चकमक!

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्यात खासगी ठरावाच्या चर्चेवेळी जोरदार खडाजंगी झाली. वैयक्तिक आरोप झाल्याने दोघेही आक्रमक झाले.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025

‘व्हिक्टोरियां’चे नाव देऊ; रुडॉल्फ फर्नांडिस

जुने गोवे आणि पणजीला जोडणाऱ्या सांताक्रुझ उड्डाणपुलाला माजी आमदार व उपसभापती दिवंगत व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी विधानसभेत केली.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025

योग्य निर्णय घेणार; शिरोडकर

बुडालेल्या मडगाव अर्बन बॅंकेत पाच लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी असलेल्यांचे पैसे परत देता येतात का हे तपासून पाहू. सहकारमंत्र्यांच्या पातळीवर तसा निर्णय घेता येत असल्यास त्याचा जरूर विचार करू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी आज विधानसभेत दिले.

Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025

मिठागरांचे सर्वेक्षण, मुख्यमंत्री सावंत

राज्यातील मिठागरांचे सर्वेक्षण केले जाईल. मिठागरे चालविणाऱ्यांना काय मदत करता येईल, त्यांना सवलत कशी देता येईल. यासाठी धोरण तयार करून पुढील अर्थसंकल्पीय विधानसभात मांडले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com