काही दिवसांपूर्वी दिगंबर कामत (Digambar Kamat) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत कामत काजूच्या झाडावर चढले असून, त्याखाली ‘बाबा फॉर 2022’ असा मेसेज टॅग केले होता. हा व्हिडीओ एडिट तर केला नसावा ना, अशी शंका काहींना आल्याशिवाय राहिली नाही. पण एका फेसबुक चॅनलकडे खुद्द कामत यांनीच यासंबंधी खुलासा करताना ‘आपण खरेच झाडावर चढलो होतो’, हे मान्य केले.
कामत प्रत्येक वर्षी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घेऊन कुठल्यातरी फार्मवर पिकनिक साजरी करण्यासाठी जातात. काही दिवसांपूर्वी ते असेच पिकनिकला गेले असता, सहज म्हणून काजूच्या झाडावर चढले. त्यांच्या एका कर्मचाऱ्याने हा व्हिडीओ शूट करून समाज माध्यमांवर टाकला. अर्थातच तो वणव्यासारखा सगळीकडे पसरला.
कामत म्हणतात, मी लहानपणी झाडावर सहजपणे चढायचो, ती सवय अजून आहे. मात्र त्यातून कामत याही वयात किती फिट आहेत ते दिसून आले. काँग्रेस पक्षाची सूत्रे त्यांच्या हाती दिली, तर ती सांभाळताना ते असाच फिटनेस दाखवतील यात शंका नसावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.