आज 19 फेब्रुवारी, थोर मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. ही महाराष्ट्र राज्यात शिवाजी जयंती किंवा शिवजयंती म्हणून साजरी केली जाते. परंतु शिवाजी महाराज यांची ख्याती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून देश आणि विदेशातही महाराजांचा नावलौकीक आहे. राजेच्या जिवनावर आधारीत अनेक चित्रपट आले आहेत. त्यांच्या 392व्या जयंतीनिमित्त, मोठ्या पडद्यावर राजे शिवाजींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांबद्दल जाणून घेवूया. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)
संतोष मांजरेकर दिग्दर्शित 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या महेश मांजरेकर यांनी त्यांच्या भूमिकेतून कौतुकास्पद काम केले आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, सुचित्रा बांदेकर, प्रिया बापट आणि अभिजीत केळकर मुख्य भूमिकेत होते.
ओम राऊत यांचा ब्लॉकबस्टर ‘तान्हाजी एक मराठा योद्धा हा चित्रपट 2020मध्ये मोठ्या पडद्यावर आला होता. यामध्ये तानाजी मालुसरे यांच्या जीवनाचा प्रवास दाखवला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात जवळचा सहकारी आणि लष्करी नेता होता. शरद केळकर यांनी राजे शिवाजींची भूमिका या चित्रपटात साकारली होती. यात अजय देवगण, सैफ अली खान आणि काजोल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
हलाल, हिरकणी, फर्जंद यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला मराठी स्टार चिन्मय मांडलेकर याने 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड' यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून आपल्या चाहत्यांना प्रभावित केले आहे. महाराजांच्या जिवनावर आधारीत चित्रपटांना मराठी सिनेरसिकांनीही मोठी दाद दिली आहे.
यशवंत भालकर दिग्दर्शित ‘राजमाता जिजाऊ’मध्ये अमोल कोल्हे, मिलिंद गुणाजी, राहुल सोलापूरकर, आरती शिंदे, वेदांत गुंडू आणि निखिल नेर्लेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. शिवाजी राजे यांच्या भूमिकेत अमोल कोल्हे यांनी कौतुकास्पद काम केले आहे. हा चित्रपट आवर्जून बघण्यासारखा आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.