गणेश गावकर यांना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (P S Sreedharan Pillai) यांनी आमदारकीची शपथ दिली तसेच, इतर आमदारांना शपथ देण्याचे अधिकार दिले.
दिगंबर कामत आमदारकीची शपथ घेताना
मगोचे सुदिन ढवळीकर यांनी विजयानंतर भाजपला आपला पाठिंबा देऊनही आता यावरून कोणताच निर्णय होताना दिसत नाही.
भाजपचे उमेदवार कृष्णा उर्फ दाजी साळकर शपथ घेताना
दाबोळीचे भाजपचे उमेदवार माविन गुदिन्हो यांनीदेखील शपथ घेतली.
नुवे मतदारसंघातील काँग्रेस आलेक्स सिक्वेरा आमदारकीची शपथ घेताना..
कुडतरी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवलेले आलेक्स लॉरेन्स रेजिनॉल्ड यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
गोव्याचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेचे सदस्य म्हणून आज शपथ घेतली. "लोकांच्या सतत प्रेम आणि विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी काम करत राहीन." अश्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
भाजपचे म्हापसाचे ज्योशुआ डिसोझा आमदारकीची शपथ घेताना..
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे भाजपचे विश्वजित राणे यांनीदेखील आमदारपदाची शपथ घेतली.
प्रियोळ भाजपचे गोविंद गावडे शपथ घेताना...
भाजपचे फोंडयाचे रवी नाईक यांनी विजायानंतर मगोच्या पाठिंब्याला नकार दिल्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा वाढला आहे.
सर्वाधिक मते मिळवून विजयी झालेल्या दिव्या राणे आमदारकीची शपथ घेताना..
गोव्याचा भावी मुख्यमंत्री कोण होणार यावरून सध्या भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस पाहायला मिळत आहे. विश्वजित राणे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा भाजप पक्षश्रेष्ठी पूर्ण करणार का याकडे गोवेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
अशाप्रकारे आज विधानसभेत आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.