

Lucky Zodiac Signs 2026: ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या सातत्यपूर्ण हालचालींमुळे वेळोवेळी अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होत असतात. सध्या नवग्रहांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेले शनिदेव आणि केतू ग्रह हे एकमेकांपासून 6व्या आणि 8व्या भावात स्थित आहेत. या दोन्ही ग्रहांच्या अशा स्थितीमुळे ज्योतिष शास्त्रात अत्यंत शक्तिशाली मानला जाणारा 'षडाष्टक योग' निर्माण झाला. हा योग सर्वच राशींसाठी सारखा नसला, तरी काही विशिष्ट राशींसाठी पुढील 5 महिने म्हणजेच नोव्हेंबर 2026 च्या शेवटपर्यंत अत्यंत भाग्यशाली आणि सुवर्णकाळ घेऊन येणारा ठरणार आहे.
या षडाष्टक योगाच्या शुभ प्रभावामुळे मेष, मिथुन, सिंह आणि धनु या चार राशींच्या जातकांना बंपर लाभ मिळण्याची शक्यता असून, त्यांच्या करिअर आणि नोकरीत प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत.
मेष राशीच्या लोकांसाठी शनि-केतूचा हा षडाष्टक योग अत्यंत फलदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या धैर्यात आणि आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कार्यक्षेत्रात मोठे यश मिळेल आणि ऑफिसमध्ये तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कष्टाचे पूर्ण फळ तुम्हाला या काळात प्राप्त होईल आणि बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील. दुसरीकडे, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक सुबत्ता घेऊन येईल. तुम्हाला विविध मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता आहे. जे लोक राजकारणात सक्रिय आहेत, त्यांना एखादे मोठे किंवा उच्च पद मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप मजबूत होईल.
सिंह राशीच्या जातकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला प्रचंड नफा कमावण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक नवीन आणि चांगल्या संधी तुमच्या दाराशी येतील. जे व्यापारी आहेत, त्यांची एखादी मोठी आणि फायदेशीर डील फायनल होऊ शकते, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. शेवटची भाग्यवान राश म्हणजेच धनु राशीच्या लोकांसाठी देखील हा षडाष्टक योग अत्यंत शुभ संकेत देत आहे. तुम्हाला करिअर आणि व्यापारात मोठा आर्थिक फायदा होईल. भागीदारीत करत असलेल्या कामांमध्ये यश मिळेल. नवीन गुंतवणूक (Invesment) करण्यासाठी हा काळ व्यापाऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.