Budh Guru Yuti 2026: स्वातंत्र्यदिनी ग्रहांचा दुर्मिळ अन् महाशुभ संयोग! बुध-गुरु युतीनं उजळणार 5 राशींचं भाग्य; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

Budh Guru Yuti In Kark Rashi: वैदिक ज्योतिशास्त्रानुसार आकाशात आज (15 ऑगस्ट) एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आला.
Budh Guru Yuti In Kark Rashi
Budh Guru Yuti 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

Budh Guru Yuti In Kark Rashi: वैदिक ज्योतिशास्त्रानुसार आकाशात आज (15 ऑगस्ट) एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आला. दुपारी 4 वाजून 51 मिनिटांनी बुध आणि गुरु हे दोन महत्त्वाचे ग्रह 0 अंशावर एकत्र आले. कर्क राशीत या दोन्ही ग्रहांच्या मिलाफामुळे एका शक्तिशाली युतीची निर्मिती झाली. ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धिमत्ता आणि व्यापाराचा कारक मानला जातो, तर गुरु हा ज्ञान, समृद्धी आणि सौभाग्याचा कारक मानला जातो. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता, ज्ञान आणि व्यापार क्षेत्रात प्रचंड वृद्धी होते.

आज निर्माण झालेल्या या शुभ योगाचा वृषभ, सिंह, धनु, मकर आणि मीन या 5 राशींच्या जातकांना तगडा फायदा होणार असून त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळणार आहे.

Budh Guru Yuti In Kark Rashi
Horoscope: शनिवार ठरणार भाग्याचा दिवस! 'या' राशींवर राहणार हनुमानाची कृपादृष्टी; आर्थिक लाभासह करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरेल. नोकरी करणाऱ्यांच्या मेहनतीचे चीज होईल आणि त्यांना आर्थिक बचत करण्यात यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांसाठी अचानक भाग्याची साथ लाभून धनलाभाचे नवीन मार्ग खुले होतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील आणि गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळून मान-सन्मानात वाढ होईल. धनु राशीच्या जातकांचे कौटुंबिक जीवन सुखमय राहील. योग्य नियोजन करुन केलेल्या कामांमध्ये त्यांना मोठे यश आणि अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Budh Guru Yuti In Kark Rashi
Horoscope: श्रावणातील शुक्रवार ठरणार खास! 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा; आर्थिक लाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

मकर राशीच्या लोकांसाठी ही युती आर्थिक स्थैर्य घेऊन आली आहे. व्यापाऱ्यांना एखादी मोठी आणि फायदेशीर डील मिळण्याची शक्यता आहे, तर नोकरीपेशा वर्गाला पदोन्नती (Promotion) किंवा वेतनवाढीची खूशखबर मिळू शकते. शेवटी, मीन राशीच्या जातकांना करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. त्यांच्या लव्ह लाईफसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक राहील आणि गुरु-बुधाच्या प्रभावामुळे कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण बनेल. एकूणच या 5 राशींसाठी हा काळ वरदान ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com