Lucky Zodiac Signs 2026: केतुची उलटी चाल अन् 5 राशींचा भाग्योदय! 2 ऑगस्टपासून पैशांचा पाऊस; बँक खात्यात होणार अचानक मोठी वाढ

Ketu Nakshatra Transit 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांपैकी गूढ, रहस्य आणि मोक्षाचा कारक मानला जाणारा छाया ग्रह केतु नेहमी उलटी म्हणजेच वक्री चाल चालतो.
Ketu Nakshatra Transit 2026
Lucky Zodiac Signs 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

Ketu Nakshatra Transit 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांपैकी गूढ, रहस्य आणि मोक्षाचा कारक मानला जाणारा छाया ग्रह केतु नेहमी उलटी म्हणजेच वक्री चाल चालतो. या ग्रहाच्या राशी बदलाबरोबरच त्याचा नक्षत्र बदलही मानवी जीवनावर आणि सर्व राशींवर प्रभाव टाकतो. ज्योतिषशास्त्रात केतुचे नक्षत्र परिवर्तन अतिशय महत्त्वाचे मानले जाते, कारण त्याचा थेट परिणाम व्यक्तीचे नशीब, करिअर, आर्थिक स्थिती आणि आयुष्यात मिळणाऱ्या नव्या संधींवर होत असतो. हे गोचर अनुकूल असल्यास अचानक मोठी प्रगती आणि धनलाभाचे योग जुळून येतात.

द्रिक पंचांगानुसार, केतु सध्या मघा नक्षत्राच्या तृतीय चरणात गोचर करत आहे, जिथे त्याने 31 मे रोजी प्रवेश केला होता. आता 2 ऑगस्ट रोजी केतु मघा नक्षत्राच्या तृतीय पदात पुन्हा विशेष हालचाल करणार असून, ही चाल 3 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच पुढील 62 दिवस कायम राहील. ज्योतिषाचार्य हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, केतुच्या या नक्षत्र बदलाचा देश-दुनियेसह 5 भाग्यशाली राशींवर अत्यंत सकारात्मक आणि व्यापक परिणाम पाहायला मिळणार आहे.

Ketu Nakshatra Transit 2026
Horoscope: सोमवार ठरणार भाग्याचा दिवस! 'या' 4 राशींना नोकरीत मोठे यश, करिअरमध्ये मिळणार सुवर्णसंधी

या महत्त्वपूर्ण गोचरचा मेष राशीच्या जातकांना मोठा फायदा होणार आहे. या काळात त्यांच्यासाठी नव्या संधी चालून येतील आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. करिअरमध्ये मोठा बदल आणि नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव वाढेल आणि जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमची आध्यात्मिक आवड वाढेल आणि अहंकार दूर ठेवल्यास हे यश दीर्घकाळ टिकेल.

Ketu Nakshatra Transit 2026
Horoscope: रविवारी चमकणार 'या' राशींचं नशीब! करिअरमध्ये मिळणार मोठं यश, आर्थिक लाभासह येणार आनंदाची बातमी

दुसरीकडे, सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय खास राहील, कारण केतु सध्या याच राशीत विराजमान आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल आणि रखडलेली पदोन्नती मार्गी लागेल. व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता असून समाजातील एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी झालेली भेट भविष्यासाठी लाभदायक ठरेल. या काळात तुमच्यात दानधर्माची प्रवृत्ती वाढेल.

Ketu Nakshatra Transit 2026
Horoscope: गुप्त नवरात्रीची शुभ सुरुवात! 'या' 3 राशींवर दुर्गामातेची विशेष कृपा, करिअर, पैसा आणि प्रेमात नशीब उजळणार

वृश्चिक आणि धनु राशीच्या जातकांसाठीही हा काळ भाग्योदयाचा ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दीर्घकाळ चालत आलेल्या अडचणी दूर होतील. नोकरी बदलण्याची उत्तम संधी मिळेल आणि व्यवसायात नवीन करार फायदेशीर ठरतील. अडकलेला पैसा (Money) परत मिळण्याची दाट शक्यता असून घरगुती वातावरणात आनंदाची उधळण होईल. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. तसेच, धनु राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासाला या गोचरमुळे नवी दिशा मिळेल. नोकरदार वर्गाला नव्या जबाबदाऱ्या मिळतील आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन कौशल्ये शिकण्याची हीच योग्य वेळ असेल. कुटुंबासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि जुने वाद संपुष्टात येतील. धार्मिक प्रवासाचे योगही जुळून येत आहेत.

Ketu Nakshatra Transit 2026
Horoscope: रविवार ठरणार खास! 'या' राशींना आर्थिक लाभ आणि यशाचे संकेत, व्यवसाय, नोकरी आणि प्रेमजीवनात मोठे बदल होणार

मीन राशीच्या जातकांसाठी 2 ऑगस्टपासून सुरु होणारा हा काळ सकारात्मक बदलांचा आणि यशाचा ठरेल. या काळात नशिबाची भक्कम साथ मिळेल आणि केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ पदरात पडेल. नोकरीत नवे यश, मुलाखतींमध्ये सकारात्मक परिणाम आणि नव्या प्रोजेक्टमधून चांगली कमाई होण्याचे मजबूत योग आहेत. विशेष म्हणजे, आर्थिक आवक वाढली तरी खर्चावर योग्य नियंत्रण राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मित्रांचे मोलाचे सहकार्य मिळेल. अनाथ किंवा गरजू व्यक्तींना मदत केल्याने मनाला मोठे समाधान लाभेल. एकंदरीत, केतुचे हे 62 दिवसांचे नक्षत्र गोचर या पाच राशींसाठी प्रगती आणि समृद्धीचा नवा अध्याय घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com