Ketu Gochar 2026: केतुची उलटी चाल! 4 राशींचे उजळणार भाग्य, करिअर-व्यवसायात होणार पैशांचा पाऊस; अवघ्या काही तासांत बदलणार आयुष्य

Ketu Nakshatra Transit October 2026 Effects: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज (3 ऑक्टोबर) रात्री 9 वाजून 48 मिनिटांनी केतु ग्रह आपली चाल बदलत मघा नक्षत्राच्या द्वितीय पदावरुन प्रथम पदात गोचर करणार आहे.
Ketu Nakshatra Transit October 2026 Effects
Ketu Nakshatra Transit October 2026 EffectsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Ketu Nakshatra Transit October 2026 Effects: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज (3 ऑक्टोबर) रात्री 9 वाजून 48 मिनिटांनी केतु ग्रह आपली चाल बदलत मघा नक्षत्राच्या द्वितीय पदावरुन प्रथम पदात गोचर करणार आहे. केतुच्या या नक्षत्र पद बदलाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पाहायला मिळणार आहे, मात्र हा गोचर काळ 4 राशींच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. या काळात या राशीच्या लोकांना जीवनातील जुन्या समस्यांपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशीच्या लोकांसाठी केतुचा हा गोचर काळ आर्थिक लाभाचा ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल आणि नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमचे रखडलेले महत्त्वाचे काम पूर्ण मार्गी लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात यश मिळेल, तर व्यापारी वर्गालाही चांगला नफा कमावता येईल. कौटुंबिक जीवनात शांततेचे वातावरण राहिल्यामुळे मन प्रसन्न राहील.

Ketu Nakshatra Transit October 2026 Effects
Horoscope: शनिवारी चमकणार 'या' 4 राशींचं नशीब! करिअरमध्ये मोठी संधी, व्यवसायात लाभ आणि कुटुंबात सुख-समृद्धीचे संकेत

कन्या राशीच्या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत उत्तम असणार आहे. केतुच्या प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून चांगल्या ऑफरची संधी मिळू शकते. तुमची एखादी महत्त्वाची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते, मात्र या सगळ्या काळात आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे राहील.

Ketu Nakshatra Transit October 2026 Effects
Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा गोचर काळ अनेकविध फायदे घेऊन आला आहे. तुमचे प्रलंबित कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. जर तुम्ही कुठे आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अतिशय अनुकूल आहे; योग्य विचार करुन केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा देऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात यश मिळवून देणारा ठरेल आणि मनातील ताणतणाव पूर्णपणे नाहीसा होईल.

Ketu Nakshatra Transit October 2026 Effects
Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्य उजळवणारा ठरु शकतो. करिअर आणि नातेसंबंधांच्या बाबतीत सकारात्मक बदल घडताना दिसतील. नोकरदार वर्गाला पदोन्नती (Promotion) किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांना एखादी मोठी आणि फायदेशीर डील हाती लागल्याने आर्थिक फायदा होईल. याशिवाय, तुमचे कुठे अडकलेले जुने पैसे परत मिळण्याचे योग असून जीवनात सुख-समृद्धी नांदेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com