Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Guru Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा राजा मानला जाणारा 'गुरु' (बृहस्पति) 20 एप्रिल 2026 सोमवारी संध्याकाळी 04:43 वाजता पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
Jupiter Transit 2026 Predictions
Guru GocharDainik Gomantak
Published on
Updated on

Guru Gochar 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा राजा मानला जाणारा 'गुरु' (बृहस्पति) 20 एप्रिल 2026 सोमवारी संध्याकाळी 04:43 वाजता पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हा गोचर अत्यंत विशेष मानला जातो कारण पुनर्वसु नक्षत्राचा स्वामी स्वतः गुरुच आहे. जेव्हा कोणताही ग्रह स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याची फळ देण्याची शक्ती अनेक पटींनी वाढते. ज्योतिषाचार्य हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, गुरुचा हा स्व-नक्षत्र गोचर ज्ञान, धन, आध्यात्मिक प्रगती आणि नवनवीन संधींचे द्वार उघडणारा ठरेल. या बदलामुळे प्रामुख्याने पाच राशींच्या जातकांसाठी 'गोल्डन टाइम' सुरु होणार आहे.

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ उर्जेने भरलेला असेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील आणि कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होईल. करिअरमध्ये (Career) नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या तुमच्या प्रगतीसाठी पूरक ठरतील. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून तुमचे आरोग्यही उत्तम राहील. मिथुन राशीसाठी हा गोचर आर्थिक सुबत्ता घेऊन येत आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. मित्र आणि सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही ध्येय गाठण्यात यशस्वी व्हाल.

Jupiter Transit 2026 Predictions
Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

कर्क राशीच्या जातकांसाठी नशिबाची पूर्ण साथ मिळण्याचा हा काळ आहे. नशिबाच्या जोरावर तुमचे करिअर उंचावेल आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. जुने वाद मिटल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तसेच, तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात स्थिरतेचे आगमन होईल. नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती दिसेल. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग असून नवीन भागीदारी व्यवसायाला मोठी कलाटणी देऊ शकते.

Jupiter Transit 2026 Predictions
Weekly Horoscope: सुवर्णसंधी चालून येणार, एप्रिलचा पहिला आठवडा 'या' राशींसाठी खासच; जाणून घ्या साप्ताहिक भविष्य

शेवटी, धनु राशीसाठी हा गोचर म्हणजे संधींचे महाद्वारच ठरणार आहे. विशेषतः परदेशाशी संबंधित कामात असलेल्यांना मोठा फायदा होईल. कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होतील आणि तुमची आध्यात्मिक ओढ वाढेल. आध्यात्मिक शांतीसोबतच आर्थिक निर्णयांमध्ये घेतलेली चतुराई तुम्हाला भविष्यात मोठा नफा मिळवून देईल. 20 एप्रिलनंतरचा हा काळ या पाचही राशींसाठी समृद्धीचा आणि यशाचा नवा अध्याय लिहिणारा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com