Horoscope: नव्या वर्षाची दमदार सुरुवात! 1 जानेवारीला 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; पैसा, नोकरी, करिअरमध्ये जबरदस्त यश

Horoscope 1 January 2026: नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे १ जानेवारी २०२६ हा दिवस अनेक राशींच्या आयुष्यात नशिबाची नवी दारे उघडणारा ठरणार आहे.
Horoscope
HoroscopeDainik Gomantak
Published on
Updated on

नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे १ जानेवारी २०२६ हा दिवस अनेक राशींच्या आयुष्यात नशिबाची नवी दारे उघडणारा ठरणार आहे. पंचांगानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी आणि चतुर्दशी तिथीच्या संगमावर या वर्षाची सुरुवात होत आहे. रोहिणी आणि मृगशिरा नक्षत्रासह शुभ आणि शुक्ल योगाचा मिलाफ या दिवसाला अधिक विशेष बनवत आहे. ग्रहांच्या स्थितीवर नजर टाकल्यास, गुरु मिथुन राशीत तर शनि मीन राशीत विराजमान असून, या ग्रहांच्या हालचालींचा सर्व १२ राशींवर खोलवर परिणाम होणार आहे.

वृषभ, कन्या आणि कुंभ राशींना धनलाभाचे संकेत

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. जरी काही बाबतीत संभ्रमावस्था असली, तरी दिवसाचा शेवट गोड अन्नाने होईल. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा आहे.

प्रभावशाली व्यक्तींच्या भेटीमुळे रखडलेली कामे मार्गी लागतील आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ कर्जमुक्त होण्यासाठी उत्तम आहे. कुटुंबात मंगल कार्याचे नियोजन होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.

Horoscope
Goa Municipal Election: पालिका निवडणुकांसाठी प्रभाग राखीवता तातडीने जाहीर करा, अन्‍यथा न्यायालयात जाणार; विजय सरदेसाईंचा इशारा

मेष आणि कर्क राशीसाठी प्रगतीची नवी संधी

मेष राशीच्या जातकांसाठी स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग जुळून येत आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना यश मिळेल, मात्र कामाच्या व्यापा मुळे काहीसा थकवा आणि चिडचिड जाणवू शकते. कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये बढती मिळण्याची चिन्हे आहेत. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ असला तरी, कोणाशीही थट्टा-मस्करी करताना मर्यादा पाळणे गरजेचे आहे, अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.

सिंह आणि तुळ राशीच्या आयुष्यात आनंदाचे आगमन

सिंह राशीच्या व्यक्तींना आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, परंतु आत्मसन्मानात वाढ होईल आणि दुपारनंतर एखादी आनंदाची बातमी मिळेल. तुळ राशीचे जातक गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या तणावातून मुक्त होतील. पालकांसोबत तीर्थयात्रेला जाण्याचे भाग्य लाभू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस जबाबदारी वाढवणारा असेल.

Horoscope
Goa Electricity: करारापेक्षा जास्त वीज वापराल तर होणार दंड! वीज खात्‍याकडून नोटीस जारी

वृश्चिक, धनु आणि मकर राशीला भाग्याची साथ

वृश्चिक राशीच्या लोकांना कमी श्रमात जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे, तसेच नोकरीत बदली किंवा पदोन्नतीचे संकेत आहेत. धनु राशीच्या जातकांनी घेतलेले योग्य निर्णय त्यांना भविष्यात मोठा फायदा करून देतील. तर मकर राशीच्या लोकांसाठी वाहन सुखाचा योग असून, इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवल्यास मोठे यश संपादन करता येईल. मिथुन राशीच्या जातकांसाठी मात्र हा दिवस कष्टाचा असून, संयम राखणे हिताचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com