

Dwidwadash Yoga June 2026: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे निर्माण होणारे योग मानवी जीवनात मोठी स्थित्यंतरे घडवून आणतात. असाच एक अत्यंत प्रभावी आणि शुभ मानला जाणारा 'द्विद्वादश योग' आता लवकरच मंगळ आणि शनि ग्रहांच्या संयोगामुळे आकाराला येणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे जातकाच्या जीवनात स्थिरता येते, बुद्धीचा विकास होतो आणि सुखमय जीवनासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न यशस्वी ठरतात.
5 जून 2026 रोजी मंगळ आणि शनि हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 30 अंशांच्या अंतरावर स्थित असतील, ज्यामुळे हा अतिशय लाभकारी द्विद्वादश योग निर्माण होईल. 5 जूनच्या रात्री 12 वाजून 11 मिनिटांपासून हा योग प्रभावी होणार असून, त्याचा सकारात्मक परिणाम जून 2026 च्या सुरुवातीपासूनच काही ठराविक राशींच्या जीवनावर दिसून येईल.
या द्विद्वादश योगाचा सर्वाधिक फायदा वृषभ राशीच्या जातकांना होणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अत्यंत सुखद आणि निवांत क्षण घालवाल, ज्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुमच्या विरोधात कारस्थान करणाऱ्या शत्रूंचे खरे चेहरे या काळात तुमच्यासमोर येतील आणि विशेष म्हणजे आर्थिक आघाडीवर तुम्हाला कोणत्याही टंचाईचा सामना करावा लागणार नाही.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग व्यापारात मोठी वाढ करणारा ठरेल. जवळच्या मित्राच्या मदतीने व्यावसायिकांना नवीन भागीदार मिळतील, ज्यामुळे नफ्याचे प्रमाण लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती या काळात ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहतील आणि तुमचे आरोग्यही उत्तम राहील, कोणत्याही मोठ्या आजाराचा धोका या काळात जाणवणार नाही.
कन्या राशीच्या जातकांना या काळात एखादी मौल्यवान वस्तू प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. घरातील वातावरण उत्साहाचे आणि खेळीमेळीचे असेल. आरोग्याच्या (Health) तक्रारी, विशेषतः पायांच्या दुखण्यापासून तुम्हाला थोडा दिलासा मिळेल आणि लहान प्रवासासाठी हा काळ सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी अनुकूल असेल.
धनु राशीच्या लोकांसाठी हा योग जुन्या मित्रांच्या भेटीगाठी घडवून आणणारा आहे. घरातील तणावाचे वातावरण दूर होईल आणि मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यातही मिळेल. मकर राशीच्या जातकांना त्यांच्या मनाप्रमाणे यश मिळाल्याने मोठा आनंद होईल. तुम्ही केवळ स्वतःच खुश राहणार नाही, तर आसपासच्या लोकांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. एखादी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा काळ चांगला असून, त्यातून भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.