

Horoscope 8 April 2026: आज (8 एप्रिल 2026) चैत्र कृष्ण षष्ठी तिथी असून चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार आजचा दिवस काही राशींसाठी आर्थिक लाभाचा, तर काहींसाठी सावधगिरी बाळगण्याचा असेल.
मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील, मात्र चैनीच्या वस्तूंवर खर्च वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील.
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी धावपळ करावी लागेल. नव्या व्यावसायिक संधी मिळतील, पण घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. नवीन कामात यश मिळेल, पण विरोधकांपासून सावध राहा. कौटुंबिक वादात पडू नका, शांतता राखणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे. प्रकृतीची साथ लाभेल.
आज मनातील इच्छा पूर्ण होतील. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. मालमत्तेच्या व्यवहारात लाभ होईल. वैवाहिक आयुष्यात गोडवा राहील. सामाजिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. मात्र, प्रवासात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास आज वाढलेला असेल. कामात तुमची प्रशंसा होईल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान वाटेल. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
आज आर्थिक नियोजन करणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे योगासने आणि व्यायामासाठी वेळ काढा. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. कोणालाही उसने पैसे देताना विचार करा.
तूळ राशीच्या व्यक्तींना आज सर्जनशील कामातून आनंद मिळेल. रखडलेले महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होतील. परदेशात जाण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. प्रेमसंबंधात सुधारणा होईल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आज तुम्ही भावूक असाल. कामात मेहनत अधिक करावी लागेल, पण फळ नक्कीच मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. अचानक पाहुणे आल्याने घरातील कामात व्यस्त व्हाल. सरकारी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे, संयम ठेवा.
आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा ठरेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास यशस्वी होतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. तरुण-तरुणींना करिअरमध्ये नवीन दिशा मिळेल. आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत आहेत.
मकर राशीच्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. मात्र, आरोग्याबाबत बेजबाबदार राहू नका. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यापारात नव्या ओळखी भविष्यात फायद्याच्या ठरतील.
कुंभ राशीसाठी आजचा दिवस मध्यम असेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद महत्त्वाचा आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे. ध्यानधारणा केल्यास मानसिक शांती लाभेल.
आज तुम्हाला परिश्रमानंतर यश मिळेल. भागीदारीच्या कामात सावध राहा. मित्र-मैत्रिणींकडून मदत मिळेल. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. घरात मंगल कार्य ठरण्याचे संकेत आहेत. प्रकृती उत्तम राहील, पण डोळ्यांची काळजी घ्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.