

Libra Horoscope April 2026 Wealth Predictions: एप्रिल महिना हा तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि परिवर्तनाचा ठरणार आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपल्या राशीला साथ देणार असून आर्थिक स्थितीवर त्याचा नेमका काय परिणाम होईल, याचे विश्लेषण प्रश्न कुंडली तज्ज्ञ पंडित सुरेश पांडेय यांनी केले. ग्रहांच्या गोचरानुसार तूळ राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, मात्र काही ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे खर्चाचे पारडेही जड राहण्याची शक्यता आहे.
सूर्याचा विचार करता, 14 एप्रिल 2026 पर्यंत सूर्य तुमच्या कुंडलीच्या सहाव्या स्थानी विराजमान असेल. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल; मात्र यशासाठी थोडा अधिक संघर्ष करावा लागू शकतो. 14 एप्रिलनंतर जेव्हा सूर्य तुमच्या लाभ स्थानात (उत्पन्नाच्या घरात) प्रवेश करेल, तेव्हा खऱ्या अर्थाने आर्थिक स्थिरतेचा काळ सुरु होईल. या काळात तुमची बचत वाढेल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे योग आहेत. सरकारी कामात अडकलेले पैसे मोकळे होऊ शकतात.
दुसरीकडे, केतु ग्रहाची स्थिती तुमच्यासाठी 'लॉटरी' सारखी ठरु शकते. पूर्ण महिना केतु तुमच्या लाभ भावात राहणार असल्याने अचानक धनलाभाचे प्रबळ योग आहेत. अनपेक्षित मार्गाने पैसा हाती आल्याने तुमची अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील. मात्र, मंगल आणि शनि या दोन क्रूर ग्रहांच्या गोचरामुळे खर्चाची बाजू चिंतेचा विषय ठरु शकते. गरजेच्या वस्तूंसोबतच स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिनाभराचे आर्थिक नियोजन करणे हितकारक ठरेल.
गुंतवणुकीच्या (Investment) बाबतीत तूळ राशीच्या लोकांनी या महिन्यात विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. छोटे, झटपट नफा देणारे किंवा जोखिमयुक्त व्यवहार टाळलेलेच बरे. कोणत्याही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय मोठी रक्कम गुंतवू नका, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचे तर, एप्रिल महिना तुमच्यासाठी 'कमाई आणि खर्च' यांचा समतोल साधण्याचा काळ असेल. कौटुंबिक आघाडीवर वातावरण संमिश्र राहील, परंतु आर्थिक नियोजनावर भर दिल्यास हा महिना तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.