(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे)
गुरूवार,२४ आक्टोबर २०२४,अश्विन कृष्ण पक्ष, शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.
तिथि- आष्टमी २५l५७
रास- कर्क
नक्षत्र- पुष्य ३१l३८
योग - साध्य २९l२१
करण - बालव १३l३१
दिनविशेष - उत्तम दिवस
मेष - जोडीदाराकडून धनलाभ होण्याची शक्यता, भागीदारी सारख्या व्यवसायांमध्ये फायदा होईल, नोकरीत देखील विशेष लाभ दिसतो.
वृषभ - प्रेमात अपयश मिळण्याची शक्यता आहे, हे अपयश तुमचे नुकसान करणार नाही तर सत्य परिस्थिती दाखवेल,आपल्या करियरकडे लक्ष द्यावे असा संकेत नियती आपल्याला देत आहे.
मिथून - आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक खर्च होऊ शकतो,या ठिकाणी द्विधा मनस्थिती उत्पन्न होऊ शकते.
कर्क - आरोग्य सांभाळावे, तसेच आज फारच आळशीपणा जाणवू शकतो.
सिंह - प्रयत्नांतून यश मिळेल,कार्य करत रहा, यश नक्कीच मिळेल.
कन्या - घर संदर्भात कार्ये आज करू नका त्यात केवळ कष्ट करावे लागेल, फायदा मात्र फार कमी होईल.
तूळ - माता पित्याचे सुख मिळेल, त्यांच्या सुखासाठी काही नवीन निर्णय घ्याल मात्र ते नाराज होतील असे काही कार्ये करू नका.
वृश्चिक - आपल्या व्यवसायातून उत्तम धनलाभ होईल, कुटुंबासाठी खर्च कराल, थोडी कुरबुरी राहील परंतु अपेक्षित फायदा होईल.
धनु - आरोग्य सांभाळावे, वाहने सावकाश चलवावित कामाला लवकर पोहचावे या निमित्ताने आपण जलद गतीने वाहने चालवू नये.
मकर - जोडीदाराचे अर्थात पती/पत्नीचे असलेले गैरसमज अथवा घरात होणाऱ्या कुरबुरी कमी होताना दिसतील. घरामधे आनंद तथा प्रसन्नता जाणवेल.
कुंभ - ऑनलाईन साईटवर अजिबातच पैसे गुंतवू नका, सुरुवातीस छान वाटेल परंतु नुकसान देखील होऊ शकते.
मीन - दूरचा प्रवास होईल परंतु त्यातून आजार संभवण्याची शक्यता दिसते,त्यामुळे अधिक जलद गतीने किंवा अधिक काळ प्रवासात राहू नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.