Zuarinagar: रस्ता दिसतो मात्र, गटारे अतिक्रमणात गायब! आमदार वाझ यांच्याकडून पाहणी; कारवाईसाठी पाठवणार अहवाल

Zuarinagar to Zari road: झुआरीनगर ते झरी दरम्यानच्या रस्त्याची तसेच अतिक्रमणाची आमदार आंतोन वाझ यांनी पाहणी केली असता येथे रस्ता दिसतो मात्र, गटारे अतिक्रमणात गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
Zuarinagar to Zari road
Zuarinagar to Zari roadDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : झुआरीनगर ते झरी दरम्यानच्या रस्त्याची तसेच अतिक्रमणाची आमदार आंतोन वाझ यांनी पाहणी केली असता येथे रस्ता दिसतो मात्र, गटारे अतिक्रमणात गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

आता यासंबंधीचा अहवाल गटविकास कार्यालयाला पाठविण्यात येणार असून पुढील कारवाई करण्यात आहे. पाहणीदरम्यान सांकवाळ पंचायतीचे सचिव, इतर संबंधित सरकारी अधिकारी व काही पंच उपस्थित होते.

झुआरीनगर येथे एका नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टीक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाल्याचेही नजरेस पडले. नाल्यातील सांडपाणी, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तेथे रस्त्यावरील साकवाखाली मोठे पाईप घालण्यात आले आहेत.

तथापी, त्या पाईपांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. या गोष्टींमुळे तेथील सांडपाण्याचा निचरा होत नाही. तेथील प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या तसेच इतर वस्तू डास पैदासासाठी पुरक असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.

सांकवाळ पंचायतीने नियुक्त केलेल्या कंत्राटदराने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज होती. मात्र, तेथील साफसफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Zuarinagar to Zari road
Zuarinagar Fire: 10 दिवसांत दुसऱ्यांदा 'भडका'! भल्या पहाटे अवैध भंगार डेपोला आग; बिर्ला-झुआरीनगरमध्ये संशयाचे वातावरण

झुआरीनगर, झरी येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.सदर रस्त्याची दुरस्ती करण्यात यावी यासाठी वाहनचालकांनी मागणी केली होती.

तथापी रस्त्याकडेच्या दुकानमालक, घरमालकांनी आपल्या समोरच्या जागेवर अतिक्रमण करून अतिरिक्त बांधकामे केली आहेत.

Zuarinagar to Zari road
Zuarinagar: झुआरीनगरात उसळला आगडोंब, भंगारअड्डे भस्मसात; 'अग्निशमन'चे शर्थीचे प्रयत्न, हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तेथे बांधण्यात आलेल्या गटारांवरही बांधकामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी बांधकामाची उंची वाढविण्यात आल्याने रस्ता खाली गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही.

याप्रकरणी दखल घेताना आमदार वाझ यांन सदर अतिक्रमणे हटविण्याची गरज व्यक्त केली होती. सदर अतिक्रमणे हटविल्याशिवाय तेथे रस्ता दुरुस्ती व हॉटमिक्स कामे हाती शक्य नसल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारयांनी स्पष्ट केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com