Zuarinagar: झुआरीनगरात उसळला आगडोंब, भंगारअड्डे भस्मसात; 'अग्निशमन'चे शर्थीचे प्रयत्न, हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक

Zuarinagar Fire: झुआरीनगर येथे एका भागातील काही भंगारअड्ड्यांना मंगळवारी (ता. १८) उत्तररात्री आग लागल्याने हजारो रुपयांचे भंगारातील साहित्य जळून खाक झाले.
Zuarinagar Fire
Zuarinagar FireDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: झुआरीनगर येथे एका भागातील काही भंगारअड्ड्यांना मंगळवारी (ता. १८) उत्तररात्री आग लागल्याने हजारो रुपयांचे भंगारातील साहित्य जळून खाक झाले. या ठिकाणी जाण्यासाठी योग्य वाट नसल्याने अग्निशमन दलाला मोठी धावपळ करावी लागली.

शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने इतर भंगारअड्डे बचावले. हे भंगारअड्डे उभारताना तेथे कोणतीही सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या आगीमुळे इतर ठिकणांचे भंगारअड्डे पुन्हा चर्चेत आले आहेत. या भंगारअड्ड्यांतील प्लास्टिक मोठ्या प्रमाणात जळाल्याने काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात पसरले होते. या धुराचा काहीजणांना त्रास झाला.

झुआरीनगर येथे एका खासगी जागेतील नवीन व खासगी औद्योगिक वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात भंगारअड्डे तयार झाले आहेत. काहीजणांनी तर तेथे गोदामे घेतली आहेत. त्या गोदामांत तसेच मोकळ्या जागेतही वेळप्रसंगी भंगार वस्तूंचा साठा करण्यात येतो.

या औद्योगिक वस्तीच्या खालच्या बाजूस काहीजणांनी पत्र्यांच्या खोल्यांमध्ये भंगारअड्डे सुरू केले आहेत. ते अड्डे एकमेकांपासून दूर नाहीत. तेथे सुरक्षिततेची खबरदारी घेण्यासाठी दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही भंगार वस्तू कापण्यासाठी तेथे गॅस कटरचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तेथे गॅस सिलिंडरही असतात. या अड्ड्यांकडे जाण्यासाठी योग्य वाट नाही.

Zuarinagar Fire
Goa Taxi: यापुढे 'लिव्‍ह अँड लायसन्‍स'वर नोंदणी नाही! व्यावसायिक वाहनांवर CM प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण; लवकरच परिपत्रक जारी होणार

मंगळवारी (ता. १८) उत्तररात्री या भंगारअड्ड्यांपैकी एकामध्ये शॉर्टसर्किट होऊन आगीची ठिणगी पडली. तेथे असलेल्या कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आग आटोक्यात येईना. तेथे प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या तसेच इतर वस्तू असल्याने आग पसरू लागली. भंगारअड्ड्यांतून दाट धुराचे लोट येऊ लागले.

तेव्हा अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच विविध ठिकाणचे अग्निशमन दल आपल्या बंबांसह तेथे पोहोचले. मात्र, तेथे बंब नेण्यासाठी व उभा करण्यासाठी जागाच नसल्याने मोठी पंचाईत झाली. त्यामुळे दूरवर बंब उभे करून पाण्याचा मारा करून आग विझविण्यासाठी धावपळ करावी लागली.

मडगाव, वास्को, वेर्णा, पणजी तसेच मुरगाव बंदर प्राधिकरण, गोवा शिपयार्ड आदींच्या बंबांना पाचारण करण्यात आले. आग इतरत्र फैलावू नये यासाठी सतत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या शर्थीने ही आग बुधवारी (ता.१९) सकाळपर्यंत आटोक्यात आल्याने ती इतरत्र पसरली नाही. ही आग जवळच्या औद्योगिक युनिटकडे पसरली असती, तर भयानक परिस्थिती उद्भवली असती.

Zuarinagar Fire
Goa Taxi Issue: आता मडगाव-काणकोण टॅक्सीचालकांमध्‍ये संघर्ष, प्रकरण थेट पोलिसांत; एकमेकांची टॅक्‍सी रोखली

भंगारअड्डे कायदेशीर की बेकायदा?

या आगीमुळे पत्रे वाकडेतिकडे झाले होते. त्याखाली प्लास्टिक वस्तूंसह आग धुमसत होती. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पणजीहून हायड्रोलिक शिडी असलेल्या बंबास पाचारण करण्यात आले. प्लास्टिक वस्तूंमुळे आग पुन्हा पेट घेत होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडत होती. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही.

तेथे आग लागल्यावर इतरांनी मोकळ्या जागेत असलेले आपले भंगार साहित्य गोदामात हलविण्यास आरंभ केला. कदाचित सरकारी अधिकारी आले, तर त्यांच्या नजरेस मोकळ्या जागेवरील भंगार पडू नये हा हेतू असावा. तेथे दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचा दावा करण्यात आला. अग्निशमन दलाने इतर गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने आणखी हानी टळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com