Zuari Nagar: 10 मीटरचा रस्ता झाला 6.5 मीटर! झुआरीनगर परिसरातील अतिक्रमणांविरुद्ध स्थानिक आक्रमक

Zuari Nagar Road Protest: झुआरीनगर येथील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे हटवून रस्ता पूर्ववत करावा या मागणीसाठी विद्यानगर रहिवासी संघटनेने मोर्चा काढला.
Zuari Nagar road encroachment protest
Zuari Nagar Road EncroachmentDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: झुआरीनगर येथील एमईएस महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे हटवून रस्ता पूर्ववत करावा या मागणीसाठी विद्यानगर रहिवासी संघटनेने रविवारी मोर्चा काढला. मोर्चात सहभागी झालेल्यांनी अतिक्रमणाविरोधात निरनिराळ्या घोषणा दिल्या. तेथील रस्ता पूर्व स्वरूपात आणण्यासाठी सांकवाळ पंचायतीने संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली.

विद्यानगर - झुआरीनगर येथे दिवसेंदिवस वस्ती वाढत आहे. तेथील परिसरात मोठे गृह प्रकल्प उभे राहत असल्याने तेथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तथापि, त्या रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनी तसेच काही घरमालकांनी अतिक्रमणे केल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. याप्रकरणी दखल घेताना सांकवाळ पंचायतीने संबंधितांना ती अतिक्रमणे हटविण्यासंबंधी नोटिसा दिल्या होत्या,

परंतु ती अतिक्रमणे अद्याप तशीच आहेत. त्यामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी रविवारी (ता. २०) मोर्चा काढून संबंधितांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या संख्येने रहिवासी त्या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचे रूपांतर नंतर सभेत झाल्यावर तेथे काहीजणांनी आपले विचार मांडले. ती अतिक्रमणे हटलीच पाहिजेत, अशी मागणी यावेळी बहुतेकांनी केली.

Zuari Nagar road encroachment protest
Bhoma Road: 'भोम' बगलमार्गासंदर्भात लोकांमध्ये अनेक गैरसमजुती! मंत्रालयात येऊन माहिती घ्या; मुख्यमंत्र्यांचे ग्रामस्थांना आवाहन

संघटनेचे अध्यक्ष सागर तोरस्कर यांनी रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनी रस्त्याकडेला सिमेंट काँक्रीट घालून अतिक्रमण करून तेथे माल ठेवण्यास आरंभ केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे.

त्यातच मोठ्या गृह प्रकल्पांकडे निरनिराळे टँकर्स या रस्त्याने ये-जा करीत असल्याने तेथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना, दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन पुढे जावे लागत आहे. खरे तर टँकरांसाठी दुसरीकडून दोन रस्ते आहेत, परंतु टँकरचालक त्या रस्त्यांचा वापर न करता एमईएस महाविद्यालयालगतच्या रस्त्याचा वापर करतात, असे सांगितले.

Zuari Nagar road encroachment protest
Malpe Bypass Road: मालपे बायपास अजूनही वाहतुकीस बंद! नागरिकांचा जुन्या रस्त्यावरून धोकादायक प्रवास

‘दुकानदारांविरोधात कारवाई करा’

पंचायतीने याप्रकरणी दखल घेऊन त्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्याची गरज आहे. दुकानदारांना सीमा आखून देण्याची गरज आहे. आम्ही या गोष्टीसाठी सर्वेअरला बोलाविले होते, परंतु त्या कार्यालयातून कोणीच आले नाही. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांविरोधातही कारवाई होण्याची गरज आहे, असे संघटनेचे अध्यक्ष सागर तोरस्कर यांनी सांगितले.

रस्ता दहा मीटरवरून साडेसहा मीटरवर!

पंच संतोष देसाई यांनी हा रस्ता दिवसेंदिवस लहान होत चालला असल्याचे सांगितले. येथे लोकसंख्या, वाहने वाढत आहेत. तथापि, रस्त्याची रुंदी कमी होत आहे. या रस्त्याची रुंदी दहा मीटर होती. ती आता साडेसहा मीटर झाल्याचे ते म्हणाले. या रस्त्याची पाहणी करण्यासाठी पंचायतीने संबंधित स्थानिक सरकारी कार्यालयांना कळविले होते, परंतु अद्याप कोणीच आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com