Zuarinagar: हृदयद्रावक! फ्रीजखाली गेलेला चेंडू काढताना बसला शॉक; झुआरीनगरातील चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Zuarinagar Boy Death News: आरीनगर येथे मुस्ताग अहमद सुरंगी या बारा वर्षीय मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे.
Zuarinagar news
Zuarinagar electric shock incidentDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: झुआरीनगर येथे मुस्ताग अहमद सुरंगी या बारा वर्षीय मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्ताग अहमद हा आपल्या आईवडील व मोठ्या बहिणीसह झुआरीनगर येथे रहात होता. शनिवारी (ता. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास तो घरात चेंडूने खेळत होता.

Zuarinagar news
Priya Marathe Death: "माझी बहीण लढवय्या होती पण त्या कॅन्सरने..." प्रियाच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावनिक पोस्ट

खेळता खेळता त्याचा चेंडू तेथील फ्रीजखाली गेला. फ्रीजखाली गेलेला चेंडू काढण्याचा तो प्रयत्न करीत असताना त्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे तो तेथेच निपचित पडला. त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्याला उपचारासाठी कासावली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

Zuarinagar news
Goa Drowning Deaths: चिंताजनक! गोव्यात 419 जणांचा बुडून मृत्‍यू, 2023 साली सर्वाधिक घटना

तथापि, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पंचनामा केल्यावर मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविण्यात आला. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजदत्त आर्सेकर पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com