‘झुआरी पूल डिसेंबरमध्ये खुला’

पुलाचे काम पूर्ण करण्याची जी वेळ संबंधित कंत्राटदार कंपनीला दिली आहे
New Zuari bridge
New Zuari bridgeDainik Gomantak

पणजी: झुआरी नदीवरील नव्याने उभारला जात असलेला केबल स्टेड पूल डिसेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. एका खाजगी स्थानिक वृत्तवाहिनीला त्यांनी ही माहिती दिली. पुलाचे काम पूर्ण करण्याची जी वेळ संबंधित कंत्राटदार कंपनीला दिली आहे, त्या वेळेत ते होणे अशक्य वाटत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आणि काही तांत्रिक कारणांमुळे ते काम सप्टेंबर महिन्यात कंपनीला पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असे काब्राल यांनी सांगितले.

(Zuari Bridge to open in December)

New Zuari bridge
राज्यात पावसाचा कहर सुरूच!

या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर जुन्या पुलावरील वाहतुकीचा बोजा कमी होणार आहे. त्याशिवाय या महामार्गावरील वाहतूकही सुरळीत होणार आहे. सध्यापर्यंत बांबोळी ते आगशीपर्यंतचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे; तर केबल स्टेड पुलाचे 92 टक्के काम पूर्ण झालेले आहे. कुठ्ठाळी ते वेर्णा या टप्प्याचे 99 टक्के काम झालेले आहे.

शेवटच्या तीन महिन्यांत पुलाच्या वजनाच्या आणि इतर काही चाचण्या होणार आहेत. राज्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल सर्वांत महत्त्वाचा आहे. हा पूल वाहतुकीला कधी खुला होणार, याविषयी अनेकांना उत्सुकता लागून आहे. आता वाहनधारकांना डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी पूल खुला होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com