Zuari Bridge Accident Case : अपघातानंतर पुलाच्या तुटलेल्या कठड्याचे काम सुरू

तुटलेला कठडा पुन्हा बांधण्याचे आणि रस्त्यावरील खड्ड्याचे काम सुरू झाले आहे.
broken railing work starts
broken railing work starts Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : बुधवारी मध्यरात्री झुआरी पुलावर झालेल्या भीषण अपघातामुळे राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. कार पुलाचा कठडा तोडत नदीत कोसळली. त्यानंतर तब्बल 12 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. अनेकांनी खराब रस्त्यांच्या स्थितीमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

झुआरी पुलावर अपघाताच्या ठिकाणी काही खड्डे आणि आणि रस्त्यामध्ये अंतर (गॅप) असल्याचे आढळून आले आहे. यानंतर आता तुटलेला कठडा पुन्हा बांधण्याचे आणि रस्त्यावरील खड्ड्याचे काम सुरू झाले आहे.

(broken railing work starts)

broken railing work starts
Nilesh Cabral: अपघाताचे खापर सरकारवर नको, वेगावर नियंत्रण आवश्यक - काब्राल

दरम्यान, गोव्यात आतापर्यंत रात्रीच्यावेळी झालेले 90 ते 95 टक्के अपघात हे 'ड्रंक अँड ड्राईव्ह'मुळे झाले आहेत. दारू पिऊन वाहन चालवणे पूर्णपणे बंद झाले पाहिजे.

खरतर मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांना फक्त दंड घेऊन सोडण्यात येते. पण यात बदल झाला पाहिजे. यावर निर्बंध घालण्यासाठी कायद्यात बदल करण्याचीही सरकारची तयारी आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दुसरीकडे, आप नेते अमित पालेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'झुआरी पुलावर जिथे खड्डे आणि रस्त्यामध्ये अंतर (गॅप) आहे, तिथून येणारी-जाणारी प्रत्येक गाडी सावकाश होते. त्याच ठिकाणाहून काल अपघात झालेली गाडी ब्रेक करून पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली.'

गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खाते आणि सरकार या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत कारण त्यांना गोव्यातील जनतेशी काही घेणेदेणेच नाही. सरकारने गोव्याला खड्ड्यात टाकले आहे. या किंवा कोणत्याही घटनेचे राजकारण करणे चुकीचेच आहे परंतु घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com