Nilesh Cabral: अपघाताचे खापर सरकारवर नको, वेगावर नियंत्रण आवश्यक - काब्राल

Nilesh Cabral on CZMP
Nilesh Cabral on CZMPDainik Gomantak

झुआरी कार अपघातावरून (Zuari Car Accident) आता आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल (PWD Minister Nilesh Cabral) यांनी सरकार होत असलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. अपघात टाळण्यासाठी वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे, विनाकारण सरकारवर आरोप करू नयेत. तसेच, सरकार राज्यातील जीर्ण पुलांची डागडुजी करत आहे. असे सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल म्हणाले.

Nilesh Cabral on CZMP
AAP to CM: ‘ई-वाहन’ धोरण यशासाठी सावंत सरकारने केजरीवालांचा सल्ला घ्यावा

90 ते 95 टक्के अपघात हे 'ड्रंक अँड ड्राईव्ह'मुळे - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

'गोव्यात आतापर्यंत रात्रीच्यावेळी झालेले 90 ते 95 टक्के अपघात हे 'ड्रंक अँड ड्राईव्ह'मुळे झाले आहेत. दारू पिऊन वाहन चालवणे पूर्णपणे बंद झाले पाहिजे. अशी प्रतिक्रिया झुआरी कार अपघातावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांना फक्त दंड घेऊन सोडण्यात येते. पण यात बदल झाला पाहिजे. यावर निर्बंध घालण्यासाठी कायद्यात बदल करण्याचीही सरकारची तयारी आहे, असे सावंत म्हणाले.

Nilesh Cabral on CZMP
Goa Illegal Bar Row: सिली सोल्स कॅफे आणि बार संबधित पुढील सुनावणी 22 ऑगस्टला

'लोटली' गावावर पसरली शोककळा

झुआरी पुलावरुन बुधवारी मध्यरात्री कार नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. तब्बल 12 तासांनंतर अपघातग्रस्त काळ्या रंगाची डस्टर कार बाहेर काढण्यात शोधपथकाला यश आलं आहे. आता कारमधील 4 मृतदेहही कारचा पत्रा कापून बाहेर काढण्यात आले आहेत. या अपघातात लोटली गावात ''पुपूल'' या नावाने लोकप्रिय असलेल्या लोटलीच्या माजी पंच प्रिसीला क्रुज हिच्यासह तिचे पती हेन्री आरावजो, दिर हेली (अल्विन) आरावजो आणि त्यांचा शेजारी ऑस्टिन फर्नांडिस या चार जणांना एकाच दिवशी अपघाती मृत्यू आल्याने संपूर्ण लोटली गावाला धक्का बसला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com