ZP Election: आरोग्यसेवेसाठी 'आप'चे खास प्रयत्‍न, जि.पं. निवडणुकीत विजयी झाल्‍यास विकास जनतेच्‍या दारी - सुवर्णा हरमलकर

ZP Election Goa:नाईकवाडा, मांद्रे येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिरावेळी सुवर्णा हरमलकर बोलत होत्या.
ZP Election
ZP ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: आपण जिल्हा पंचायत निवडणुकीत विजयी झाले तर जनतेला आपल्या दारी नव्हे, आपण जनतेच्या दारी जाईन. शिवाय जनतेला कशा प्रकारचा जाहीरनामा हवा ते लोकांच्या समस्येवरून ठरणार, तसेच मतदार संघातील गावागावात वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न असतील, शिवाय आरोग्य सेवेवर भर देणार, अशी ग्वाही मोरजी जिल्हा पंचायत मतदार संघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवार सुवर्णा हरमलकर यांनी दिली.

नाईकवाडा, मांद्रे येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिरावेळी त्या बोलत होत्या. आम आदमी पक्षाचे व्हिजन हे स्वास्थ आरोग्य सेवा हे असून मतदारसंघातील रस्ते खड्डेमय बनणार नाही, ते दर्जेदार होईल, यावर भर देणार असल्याचे हरमलकर म्हणाल्या. आम आदमी पक्षाने मुख्यमंत्र्याला निवेदन भेटवल्यानंतरच रस्त्याच्या कामाला गती मिळाल्याचा दावा हरमलकर यांनी केला.

ZP Election
Goa Youth Festival: पणजीत युवा महोत्सव, 1 ते 2 डिसेंबर रोजी कला अकादमीत आयोजन; 10 हजार तरुण सहभागी होणार

आम आदमी पक्षातर्फे राज्यभर दवाखाने सुरू केले आहेत. गावडेवाडा, मांद्रे या ठिकाणी दवाखाना सुरू झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी वाड्यावाड्यांवर मोफत आरोग्य शिबिरे भरवण्यात येत आहेत. तसेच औषधे मोफत दिली जात आहेत, असे हरमलकर यांनी सांगितले.

वाहतुकीची सोय करणार

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी वाहतुकीची सोय नाही. ती सोय सरकारद्वारे पुरवण्याचा आणि पाठपुरावा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेला भाड्याच्या टॅक्सी रिक्षा परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे सरकारची वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील असे हरमलकर म्हणाल्या.

ZP Election
Goa Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पाचा पेच सर्वोच्च न्यायालयात, 'आदेश सर्वांना बंधनकारक'; वनमंत्री राणेंची माहिती

जाहीरनामा जनतेचा

सुवर्णा हरमलकर यांनी जाहीरनामा जनतेला कसा हवा, जनतेच्या अडचणी कोणत्या आहेत? त्याला प्राधान्य देत जनतेच्या मागणीनुसार वचननामा जाहीरनामा केला जाईल, असे त्या म्हणाल्या. उमेदवारांचा जाहीरनामा जनतेने राखून ठेवला पाहिजे. निवडणुका झाल्यावर जाहीरनाम्याकडे कोणी लक्ष देत नाही. परंतु आम आदमी पक्ष तसे करणार नाही. जाहीरनाम्यातील कोणकोणती आश्वासने पाळली याचा जाब जनतेने विचारावा, असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com