वार्षिक गुलालोत्सवासाठी जांबावली सज्ज

हजारोंच्या संख्येने गोमंतकीय श्री दामबाब देवावर करणार गुलालाची उधळण
Zambaulim Gulalotsav 2022
Zambaulim Gulalotsav 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात येत असलेला जांबावलीचा प्रसिद्ध वार्षिक गुलालोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. जांबावलीच्या शिमगोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. गेले सहा दिवस विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम हजारो भक्तांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते. मंगळवारी शिमगोत्सवाचा महत्वाचा दिवस असून संध्याकाळी 3.30 वाजता श्री रामनाथ देव मंदिराच्या प्रांगणात गुलालोत्सवाला सुरुवात होणार आहे.

Zambaulim Gulalotsav 2022
गोव्याच्या मंत्रिमंडळात महिलांना 'नो एंट्री'?

या गुलालोत्सवाला हजारोच्या संख्य़ेने भाविक आणि भक्तगण हजर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आयोजक मठ ग्रामस्थ हिंदू सभेने गुलालोत्सवाची सर्व तयारी केली आहे. शिवाय केपे पोलिसांनी वाहतूक (Traffic) आणि शिस्त राखण्यासाठीही सर्व उपाययोजना केल्या आहेत. पहाटे श्री दामोदराची पालखी रामनाथ मंदिराच्या प्रांगणात आणून ठेवली जाईल आणि दुपारी गुलालोत्सवानंतर परत आपल्या मंदिरात नेली जाणार आहे. दामोदर देवावर गुलाल उधळल्याशिवाय भक्तांनी गुलालोत्सवाला (Festival) सुरुवात करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Zambaulim Gulalotsav 2022
प्रमोद सावंत मंत्रिमंडळात ख्रिस्ती समाजाला झुकतं माप?

गुलालोत्सवानंतर रात्री 11 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री 12 वाजता संगीत सभा होणार आहे. बुधवारी सकाळी धुळपेटीने उत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान जांबावली परिसरात 400 पोलीस (Police) तैनात केले जाणार आहेत. मात्र देव दामोदराच्या मंदिराबाहेर थाटली जाणारी दुकाने आता जरा दूर ठिकाणी हलवण्यात आली आहेत. याजागी वाहने पार्क करण्यासाठी आणि गुलालोत्सवासाठी पुरेशी जागा उपलब्ध करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cricket betting racket in Goa
MGP political controversy
EV charging stations in Goa
Goa fishing trawler on hydrogen fuel
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com