Goa Jetty Policy: गोव्याच्या शुद्ध नद्या भांडवलदारांच्या घशात घालू नका

विरोधी पक्षनेते युली आलेमाव यांची टीका; जेटी धोरणाविरोधात गोवा पर्यटन कार्यालयाबाहेर विरोधक एकवटले
Protest Against Jetty Policy
Protest Against Jetty PolicyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Jetty Policy: पर्यटन खात्याने तयार केलेल्या जेटी धोरणाला विरोध वाढू लागला आहे. या धोरणाविरोधात आता विरोधक एकटवले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या धोरणावर टीका केली आहे.

Protest Against Jetty Policy
Goa School Bus: 20 बालरथ रस्त्यावर धावण्यास तयार

गोव्यातील शुद्ध नद्या भांडवलदारांच्या ताब्यात देऊ नका. डबल इंजिनला परवानगी देऊ नका. गोव्यातील भाजप सरकार गोव्याची मूळ ओळख नष्ट करत आहे. गोव्यात सर्वत्र कोळसा आणि कॅसिनो पसरू देऊ नका. गोव्याच्या भल्यासाठी लढण्यासाठी मी गोवावासीयांसमवेत आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

विरोधकांसह काही एजीओंकडून गोवा पर्यटन कार्यालयाच्या बाहेर जेटी धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली. जेटीच्या खासगीकरणाचा हा डाव असून यामुळे मच्छिमारांचे नुकसान होणार आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. यावेळी आंदोलकांनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

दरम्यान, पर्यटन खात्याने नागरिकांकडून सूचनांसाठी मसुदा खुला केला असला तरी एक खिडकी तिकीट प्रणाली सोडल्यास इतर गोष्टी त्यातून वगळण्यात याव्यात, अशी मागणी विरोधक आणि बंदर हाताळणीशी संबंधित तज्ज्ञांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com