Goa School Bus: 20 बालरथ रस्त्यावर धावण्यास तयार

‘फिटनेस प्रमाणपत्र’: पुढील आठवड्यात आणखी गाड्यांचे नूतनीकरण
Bal Rath
Bal RathDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वाहतूक खात्याने दिलेल्या अहवालाच्या आधारे 419 पैकी 60 बालरथ बसगाड्या या विना फिटनेस प्रमाणपत्र रस्त्यावर धावत असल्याचे बाल हक्‍क आयोगाने उघड केले होते, परंतु आयोगाने ताशेरे ओढल्यानंतर लगेच सुमारे 20 बालरथांचे फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यात आले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता असून दिवाळीच्या सुट्टीचा लाभ घेऊन अनेक शाळा नूतनीकरण करणार आहेत, अशी माहिती वाहतूक खात्याने दै. ‘गोमन्तक’ला दिली आहे.

(20 school bus ready to run on the road in goa)

Bal Rath
Goa Politics: भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी गोव्यात आज विविध विभागाच्या बैठकांचे आयोजन

बालरथांचे फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण झाले की नाही, ही तपास प्रक्रिया सध्या वाहतूक खात्याकडून सुरू आहे. त्यात 20 बालरथांचे नूतनीकरण झाले आहे, तर काहींनी नूतनीकरणासाठी अर्ज केला आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत हा आकडा सुमारे 30 देखील होऊ शकतो. दिवाळीच्या काळात शाळांना सुट्टी असल्याने तेव्हा बसगाड्यांचे निरीक्षण करून योग्य निर्णय घेण्याची संधी शाळा व्यवस्थापनाला आहे. ज्या दुरुस्त होणार नाहीत, त्यांचे नेमके काय करावे याबद्दल निर्णय घ्यावा लागेल, असे वाहतूक खात्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, 2013 मध्ये बालरथ योजना सुरू झाली होती, तेव्हा 100 बसगाड्या खरेदी केल्या होत्या, परंतु त्या बिघडल्यानंतर त्यांच्या जागी नवीन बसगाड्या देण्याची तरतूद योजनेत नाही. तसेच नवीन बसगाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव खात्याकडे आलेला नाही, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दै. ‘गोमन्तक’ला सांगितले.

Bal Rath
Goa Politics: अपात्रता याचिकेवर सुनावणीचा सभापतींनी गमावला अधिकार; गिरीश चोडणकर

कोरोना काळात झाले दुर्लक्ष

बालरथ बिघडून अनफिट होण्यास कोरोना महामारीच्या काळातच सुरवात झाली होती. शाळा बंद असल्याने बालरथ बंद ठेवण्यात आले होते, तेव्हा त्यांची योग्य देखरेख न केल्याने आता फिटनेसचा मुद्दा पुढे आला आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार टायर ही गंभीर समस्या आहे. दोन वर्षे बालरथांचा वापर न झाल्याने टायर निकामी झाले आहेत. शिक्षण खात्याकडून बालरथ योजनेअंतर्गत 3.66 लाख रुपये वार्षिक आर्थिक मदत प्रत्येक शाळेला दिली जाते. त्यात चालकाचे वेतन 11 हजार रुपये, वाहकाचे वेतन 5 हजार रुपये, 50 हजार रुपये विमा आणि 50 हजार रुपये डागडुजीसाठी दिले जातात, परंतु कोरोना काळात याच निधीचा योग्य वापर न झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com